मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात…

मुख्यमंत्रीपदासाठी रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा, उद्धव ठाकरे राहणार की जाणार? संजय राऊत म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मुख्यंत्रीपदी विराजमान होतील की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी सविस्तर प्रतिक्रिया नोंदवली.

दिनेश दुखंडे

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 05, 2022 | 3:24 PM

पणजीः  गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर उपस्थिती लावलेली नाही. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही ते गैरहजर होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मुख्यंत्रीपदी विराजमान होतील की काय, अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी प्रतिक्रिया नोंदवली.

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी? काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील काल जाहीरपणे वक्तव्य केले. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. याविषयी संजय राऊत यांनी थेट वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. मी सध्या गोव्यात आहे. पण मला त्यांची माहिती आहे. कालही त्यांनी शिवसेनेचे विभागप्रमुख, शाखाप्रमुखांशी संवाद साधला. सध्या प्रत्यक्ष संवादापेक्षा सगळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच संवाद साधत आहेत. सगळ्यांना दिसतायत ते संवाद साधताना. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील तसाच संवाद साधत आहेत. शेवटी व्यक्ती समोर दिसते, सूचना देते, फायलींवर सह्या होतायत. प्रशासनाला सूचना दिल्या जातायत. राज्यावर लक्ष ठेवलं जातंय,हे सगळं सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्यकारभार सुरु आहे. तेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यात मला कोणतीही शंका वाटत नाही.’

अब्दुल सत्तारांची हळद आणखी उतरायचीय- संजय राऊत

अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयीचे वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात 25 वर्ष पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील, अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, दुसरं कोण बोलतंय का? प्रमुख लोकांपैकी? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

इतर बातम्या-

ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर ओतली, हातात होती दोन लाखांची बॅग… परळीत धक्कादायक प्रकार

Nashik|नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार हॉकी लीगचे सामने…!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें