Sanjay Raut : खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?

संजय राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरुच असल्याचं पाहायला मिलत आहे. संजय राऊत यांनी आज राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वत: संजय राऊत यांनी या भेटीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?
संजय राऊत, खासदार, शिवसेना


नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीचा सिलसिला सुरुच असल्याचं पाहायला मिलत आहे. संजय राऊत यांनी आज राजधानी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वत: संजय राऊत यांनी या भेटीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानं कोसळेल असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्यानं केला जात आहे. मात्र, हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा संजय राऊत ठामपणे करताना पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. (Shivsena MP Sanjay Raut met Congress leader Rahul Gandhi in Delhi)

‘राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले’, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?

आगामी महापालिका आणि 2024 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने सांगत आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना आणि काँग्रेस त्यातील घटकपक्ष असूनही त्यांची स्वबळाची भाषा सुरु आहे. काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाणून आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट राहूल गांधी यांची भेट घेतली असावी, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या : 

Breaking : राज्य मागासवर्ग आयोगाचा मोठा निर्णय, राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव

Mumbai Unlock : मुंबईतील व्यापारी वर्गाला मोठा दिलासा, सर्व दुकाने आणि आस्थापना रात्री 10 पर्यंत सुरु राहणार! जाणून घ्या नवी नियमावली

Shivsena MP Sanjay Raut met Congress leader Rahul Gandhi in Delhi

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI