संजय राऊतांचा शिवसेना इच्छुकांना सबुरीचा सल्ला

अनिश बेंद्रे

|

Updated on: Dec 31, 2019 | 8:45 AM

सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे.

संजय राऊतांचा शिवसेना इच्छुकांना सबुरीचा सल्ला

मुंबई : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या शिवसेनेतील इच्छुकांना खासदार संजय राऊत यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामावून घेण्यास प्रत्येकाला जागा नसल्याचं राऊतांनी सांगितलं. (Sanjay Raut to Shivsena Desirous) एकप्रकारे संजय राऊत यांनी नाराज बंधू सुनिल राऊत यांना समजवल्याचं म्हटलं जातं.

‘लोकांनी समजून घ्यायला हवं, की तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे आमच्याकडे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. तिन्ही पक्षात पात्र व्यक्ती आहेत. आमच्या लोकांनी थोडा संयम बाळगायला हवा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, हीच आनंदाची गोष्ट आहे’ असं संजय राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक प्रचंड नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षाला आमची लायकी नाही, असं वाटलं असेल, तर आम्ही दखल घेण्यास भाग पाडू, अशा शब्दात सरनाईकांनी संतापाला वाट मोकळी करुन दिल्याची माहिती आहे.

सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राऊत बंधू नाराज असल्याच्या चर्चा होत्या. सुनिल राऊत आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं.

ठाकरे सरकारचा पहिला विस्तार

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला विस्तार पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

पक्षाला आमची लायकी वाटत नसेल : प्रताप सरनाईक

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत.

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) अनिल देशमुख  – काटोल (नागपूर) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) राजेश टोपे – उदगीर (लातूर) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

आधी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेचे मंत्री 

संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) अनिल परब – मुंबई (विधानपरिषद) उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई) शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा) बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती) राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)

आधी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेसचे मंत्री

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड) के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार) विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अमित देशमुख– लातूर शहर (लातूर) सुनिल केदार – सावनेर (नागपूर) यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती) वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई) अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद) डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

आधी बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Sanjay Raut to Shivsena Desirous

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI