पवारांवर गुन्हा चुकीचा, संजय राऊतांची प्रतिक्रिया, आव्हाड म्हणाले थँक्यू!

Nupur Chilkulwar

Nupur Chilkulwar |

Updated on: Sep 27, 2019 | 12:44 PM

कुठल्याही तक्रारीत नाव नसताना देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांवर (money laundering sharad pawar) गुन्हा दाखल का केला गेला, असा सवाल आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही, तर आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

पवारांवर गुन्हा चुकीचा, संजय राऊतांची प्रतिक्रिया, आव्हाड म्हणाले थँक्यू!

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (money laundering sharad pawar) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केला. मात्र, कुठल्याही तक्रारीत नाव नसताना देशाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवारांवर (money laundering sharad pawar) गुन्हा दाखल का केला गेला, असा सवाल आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही, तर आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तर संजय राऊत हे दुसऱ्या पक्षातील असूनही त्यांनी शरद पवारांचं समर्थन केलं, यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचे आभार मानले (Jitendra Avhad-Sanjay Raut).

“शरद पवार हे महाराष्ट्रतीलच नाही तर देशातील महत्त्वाचं व्यक्तीमत्व आहे. देशात अनेक नेते आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, चिंदंबरमही तुरुंगात गेले, पण त्यांचं प्रकरण वेगळं आहे. कुठल्यातरी बँकेत कर्जवाटपासंबंधी घोटाळा झाला आहे, हे बरोबर आहे, त्या प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. पण, ज्या प्रकरणात शरद पवारांचं नावच आलं नाही, त्या प्रकरणात तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल कराल, तर लोकांच्या मनात शंका येणारच. शरद पवारच नाही, तर त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण असते, एकनाथ खडसे असते, देवेंद्र फडणवीस असते किंवा आमचा कुठला नेता असता आणि जर त्यांचं तक्रारीत नावच नाही, न्यायालयाच्या आदेशात नाव नाही, तरीही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, हे चुकीचं आहे. त्यामुळे लोकांमध्ये खळबळ माजणारच. जे पवार साहेबांच्या विचाराचे नाही, त्यांनाही यावर विश्वास बसत नाही. शरद पवार हे देशाच्या राजकारणात गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत आहेत. त्यामुळे लोक त्यांच्याकडे त्या भावनेनी पाहातात”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा : Sharad Pawar ED LIVE : शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई : राहुल गांधी

तसेच, “महाराष्ट्रात कधीही बदल्याचं राजकारण झालं नाही, काँग्रेसच्या काळातही देशात आणि राज्यात इतक्या टोकाचं राजकारण झालं नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. अशाप्रकारे तपास यंत्रणांचाही कधी कुणी गैरफायदा घेतला नव्हता, हे देशासाठी तसेच राजकारणासाठी घातक आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यातील देवेंद्र सरकारवर निशाणा साधला.

“आमच्या हातात काही नाही, सरकार आमचं नाही, सरकार भाजपचं आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला. त्यामुळे आता भाजप-शिवसेनेत नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, संजय राऊत यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला, याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचे आभार मानले. “अशा काळामध्ये पक्षभेद विसरून संजय राऊत पाठीशी उभे राहिले. शरद पवारांनी पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक विरोधी पक्षनेत्यांना मदत केली आहे. त्यांनी द्वेषाचे राजकारण कधीच केले नाही. त्यामुळे आज दुसऱ्या पक्षातील नेतेही त्यांच्या पाठीशी आहेत. संजय राऊत यांचा पाठिंबा म्हणजे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं मी समजतो”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार, अजित पवारांसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी शरद पवार (money laundering sharad pawar) , अजित पवार (money laundering ajit pawar) यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यवहारातील 25 हजार कोटींच्या या व्यवहारात पैशांचा लाभ कुणाला हा तपासाचा मुख्य भाग आहे.

संबंधित बातम्या :

शरद पवारांकडून प्रशासन, अधिकाऱ्यांचं कौतुक, सकाळी- सकाळी फोन, पवार उद्या पूरग्रस्त भागात

शरद पवारांचं ‘ते’ ट्वीट संजय राऊतांकडूनही रिट्वीट

शरद पवारांना काय विचारायचं? ईडीची अद्याप तयारीच नाही

शरद पवारांना पहिली अटक कधी झाली होती?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI