‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, सतेज पाटलांचा खणखणीत टोला

"वातावरण बदलत चाललं आहे. भाजपचं धोरण चुकलं. कित्येक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचंच प्रतिबिंब पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात दिसलं", असं सतेज पाटील यांनी सुनावलं

'लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं', सतेज पाटलांचा खणखणीत टोला
Follow us
| Updated on: Dec 05, 2020 | 3:03 PM

कोल्हापूर : विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संबंधित काही मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना प्रश्न विचारला असता “भाजपने शेवटी जे पेरलं तेच उगवलं”, असा टोला त्यांनी लगावला (Satej Patil slams BJP).

“मी याचं समर्थन करणार नाही. पण भाजपने ज्या सोशल मीडियाचा वापर करुन 2014 साली सत्ता मिळवली, आता त्याच सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे. भाजपने जे पेरलं तेच उगवलं. लोकांनी फरफटत यावं, अशी भाजपची अपेक्षा होती”, असा दावा सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूरमध्ये आज (5 डिसेंबर) कोल्हापूर ब्रँड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं भाषण व्हायरल होत आहे, ज्यात आपण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जिंकली असं ते म्हणत होते. सगळं जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे, अशा अविर्भावत चंद्रकांत दादा बोलत होते. आता निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. हा राज्याचा मॅनडेट आहे. वातावरण बदलत चाललं आहे. भाजपचं धोरण चुकलं. कित्येक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. त्याचंच प्रतिबिंब निकालात दिसलं”, असं सतेज पाटील यांनी सुनावलं.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची चांगली मोट बांधली”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचबरोबर “लोकांना विधानसभा निवडणुकीनंतर मतदानाची संधी मिळाली नव्हती. आता ती मिळाली आहे. शेतकरी, सुशिक्षित भाजपच्या बाजूने नाहीत याची साक्ष मिळाली आहे. लोक रोष व्यक्त करत आहेत”, असं सतेज पाटील म्हणाले.

दरम्यान, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्य तिथं एकत्र लढू. जिथं तांत्रिक अडचणी आहेत तिथं नंतर एकत्र येऊ”, असं सतेज पाटील यांनी सांगितलं (Satej Patil slams BJP).

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतिश चव्हाण (राष्ट्रवादी)

नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी (काँग्रेस)

पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड (राष्ट्रवादी)

पुणे शिक्षक मतदारसंघ – जयंती आसगावकर (काँग्रेस)

अमरावती शिक्षक मतदारसंघ – किरण सरनाईक (अपक्ष)

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची पोटनिवडणूक – अमरिशभाई पटेल (भाजप)

संबंधित बातम्या :

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.