AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election 2020 Live Updates : बिहारमध्ये सकाळी दहापर्यंत केवळ 8 टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघात मतदान होत आहे. (Bihar Election Live Updates)

Bihar Election 2020 Live Updates : बिहारमध्ये सकाळी दहापर्यंत केवळ 8 टक्के मतदान
| Edited By: | Updated on: Nov 03, 2020 | 11:41 AM
Share

पाटना: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. एकूण 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवारासाठी हे मतदान होत आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD चे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचं भविष्यही आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडी विरुद्ध भाजप आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) यांच्यात लढत होत आहे.  (Voting for the second phase of Bihar Assembly elections begins)

Bihar Election 2020 Live Updates

[svt-event title=”बिहारमध्ये सकाळी दहापर्यंत केवळ 8 टक्के मतदान” date=”03/11/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ] बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात सकाळी 10 वा. पर्यंत 8.14 टक्के मतदान, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज पुन्हा आमने-सामने [/svt-event]

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 143 महिला तर एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 2 कोटी 85 लाख 50 हजार 285 मतदार आपला हक्क बजावतील. यात 1 कोटी 35 लाख 16 हजार 271 महिला तर 980 ट्रान्सजेंडर मतदार आहेत.

बिहारमध्ये बदलाची सुनामी- तेजस्वी यादव

‘बदलाच्या या सुनामीमध्ये बिहार शिक्षण, उत्पन्न, आरोग्य, सिंचन आणि महागाई या अजेंड्यावर मतदान करेल. मला विश्वास आहे की लोकांना बदल हवा आहे. बिहारची जनता बदल घडवण्यासाठी मतदान करेल. पहिल्या टप्प्यातील मतदानापासून हे स्पष्ट झालं आहे’, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी ठीक मतदान सुरु होण्यापूर्वी दिली आहे.

दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राघोपूर मतदारसंघातील 24 नंबरच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. बिहारमध्ये चिराग पासवान यांनी NDA तून बाहेर पडत दंड थोपटल्यानं निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

बाहेर पडा, मतदान करा- सुशीलकुमार मोदी

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी राजेंद्रनगरच्या सेंट जोसेफ हायस्कुलमधील मतदारसंघात मतदान केलं. त्यावेळी लोकांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, अशी विनंतीही मोदी यांनी नागरिकांना केली आहे.

बिहारच्या राज्यपालांनी बजावला मतदानाचा हक्क

बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांनी सकाळच्या सत्रात पाटन्यातील दिघामध्ये मतदानाचा हक्क बजावला. सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. यावेळी राज्यपालांनी नागरिकांना मतदानाचं आवाहनही केलं.

कोरोनामुळे मतदानाच्या वेळेत वाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ 1 तासांनी वाढवली आहे. 94 पैकी 86 मतदारसंघात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. तर उर्वरित 8 मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. यात तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघाचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या:

लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम

बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन: तेजस्वी यादव

Voting for the second phase of Bihar Assembly elections begins

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.