“गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार”, ठाकरेगटाच्या नेत्याचा मोठा दावा

ठाकरेगटाच्या नेत्याची टीका...

गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार, ठाकरेगटाच्या नेत्याचा मोठा दावा
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 1:44 PM

सोलापूर : शिंदे गटाचं (Eknath Shinde) हिंदुत्व लोकांना आणि गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाही मान्य नाही. त्यामुळे गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असा दावा शिवसेना ठाकरेगटाचे नेते, युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी (Sharad Koli) यांनी केला आहे. याचसोबत त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आधी सूरतमार्गे शिंदेगटाचे सगळे आमदार गुवाहाटीला गेले. तिथे एकनाथ शिंदेंनी सर्व आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर गोवा मार्गे सगळे आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मंत्री आणि आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. शिंदेंचं कुटुंबही यावेळी त्यांच्यासोबत आहे. यावर ठाकरेगटाच्या वतीने टीका करण्यात आली आहे.

शहाजी बापू पाटलांवर शरद कोळींची टीका

शरद कोळी यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांवर सडकून टीका आहे. शहाजी बापूंचं तोंड गटारीसारखे आहे. त्यामुळे ते संजय राऊतांवर टीका करत असतात. शाहजीबांपूनी बुडाखालचा अंधार बघावा आणि मग इतरांना बोलावं, असं कोळी म्हणालेत.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मात्र तेच हिंदुत्व आज तुम्ही खुंटीला टांगलं आहे, असं शरद कोळी म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कोशारींची तुम्ही पाठराखण तुम्ही कशी काय करता? महाराजांची बदनामी होत असताना तुमचे हिंदुत्व कुठे जातं? तुमचं हिंदुत्व गुवाहाटीला मान्य होणार नाही. गुवाहाटी वरून परत आल्यानंतर शिंदे भाजप सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, असं शरद कोळी म्हणालेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.