West Begnal results 2021: ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

शरद पवार हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांचा प्रचार करणार होते. | Mamata banerjee Sharad Pawar

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:42 AM, 3 May 2021
West Begnal results 2021: ममता बॅनर्जींच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
ममता बॅनर्जी आणि कैलास विजयवर्गीय

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला एकहाती धूळ चारल्यानंतर आता देशभरात त्यांच्या या विजयाची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय (Kailsh vijayvargiya) यांचे एक वक्तव्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. कैलास विजयवर्गीय यांच्या या दाव्यानुसार पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयमागे शरद पवार यांचा हात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कैलास विजयवर्गीय यांच्या विधानाचा हवाला देत एक ट्विट केले आहे. (NCP Supremo Sharad Pawar behind victory of TMC Mamta Banerjee in West Bengal Election 2021)

भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनीच हा गौप्यस्फोट केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय, असं कैलास विजयवर्गी यांनी म्हटल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा अर्थ पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता, असा निष्कर्ष जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे.

पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी एकहाती भाजपला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आजारपणामुळे शरद पवार ममतादीदींच्या प्रचाराल गेले नाहीत

शरद पवार हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांचा प्रचार करणार होते. काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, ही विनंती डावलून शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीला जाण्याचे ठरवले होते.

मात्र, अचानक शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे शरद पवार यांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्यात आला होता.

संबंधित बातम्या: 

“जनतेने दिलेला कौल स्वीकारायला हवा होता, हा तर रडीचा डाव”, ममतांच्या पराभवानंतर शरद पवार बरसले

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

पश्चिम बंगालचा ट्रेंड बदलला; 6 वर्षे बंगालमध्ये ठाण मांडून बसलेले कैलास विजयवर्गीय म्हणतात…