AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार-अमित शहांमध्ये 15 मिनिटांची ‘स्वतंत्र’ चर्चा, नेमकं काय घडलं असावं?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी सहकार क्षेत्र, साखर कारखानदारी, एनडीआरएफचे निकष आदी मुद्द्यांवर सुमारे सव्वा दोन तास चर्चा झाली. (Sharad Pawar-Amit Shah meeting)

शरद पवार-अमित शहांमध्ये 15 मिनिटांची 'स्वतंत्र' चर्चा, नेमकं काय घडलं असावं?
Sharad Pawar-Amit Shah
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी सहकार क्षेत्र, साखर कारखानदारी, एनडीआरएफचे निकष आदी मुद्द्यांवर सुमारे सव्वा दोन तास चर्चा झाली. मात्र, यावेळी शहा आणि पवारांमध्ये 15 मिनिटं बंद दाराआड स्वतंत्र बैठक झाली. या वेगळ्या बैठकीत राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या 15 मिनिटाच्या बैठकीतील चर्चा गुलदस्त्यात असल्याने त्याबाबत वेगवेगळे कयास लढवले जात आहेत. (Sharad Pawar Meets Amit Shah In Delhi, Two Weeks After Meeting PM Modi)

अमित शहा हे सहकार मंत्री झाल्यानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच त्यांची भेट घेतली. संसदेच्या एका कार्यालयात ही भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. ही बैठक सुमारे सव्वा दोन तास चालली. साखरेच्या विक्रीची किंमत, इथेनॉलबाबत येणारं नवं धोरण, सहकार खातं, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषात करावयाचे बदल आणि महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प बसवण्यासाठी द्यावयाची मंजुरी आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. तसेच राज्यातील पूरपरिस्थितीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 मिनिटे खलबतं

त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच पेगासस प्रकरणाबाबत पवारांनी आपली भूमिका शहांकडे मांडली असून शहांनीही सरकारची भूमिका त्यांना सांगितल्याचं समजतं. पेगासस प्रकरणावरून झालेली संसदेतील कोंडी फोडण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, याबाबतच्या वृत्ताला कोणीही दुजोरा दिला नाही.

काँग्रेस गॅसवर?

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात विरोधकांची बैठक बोलावली होती. आज सर्व विरोधकांना नाशत्यासाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांनी विरोधकांसह संसदेपर्यंत सायकल रॅलीही काढली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मात्र, हे चित्रं असतानाच पवारांनी शहांची भेट घेऊन काँग्रेसलाही गॅसवर ठेवलं आहे. त्यातच पवारांनी शहांसोबत 15 मिनिटं बंददाराआड चर्चा केल्याने या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

15 दिवसातच दुसरी भेट

या आधी 17 जुलै रोजी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. त्यामुळेही चर्चेचं मोहोळ उठलं होतं. त्यानंतर आज 3 ऑगस्ट रोजी म्हणजे 15 दिवसानंतरच पवारांनी शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे मोदी आणि शहा यांची भेट घेण्यामागे काही लिंक आहे का? असा सवालही केला जात आहे. आजच्या भेटीत मोदींसोबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (Sharad Pawar Meets Amit Shah In Delhi, Two Weeks After Meeting PM Modi)

संबंधित बातम्या:

Pawar-Shah Meet : शरद पवारांकडून अमित शाहांचं अभिनंदन, दोन्ही नेत्यांमध्ये साखरेच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा

आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!

राहुल गांधी शिवसेनेला समजून घेतायत की शिवसेनेचं काँग्रेसीकरण होतंय? वाचा सविस्तर

(Sharad Pawar Meets Amit Shah In Delhi, Two Weeks After Meeting PM Modi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.