किंचितही वाद नाही, अजित पवार जे काम हातात घेतात ते धडाडीने करतात : शरद पवार

अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. 

किंचितही वाद नाही, अजित पवार जे काम हातात घेतात ते धडाडीने करतात : शरद पवार
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 9:08 PM

पुणे : अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद (Sharad Pawar PC ajit Pawar ED) घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत (Sharad Pawar PC ajit Pawar ED) पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, माझ्यावर कारवाई झाली म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला, असं  शरद पवार म्हणाले. कधीही नोटीस न आलेल्या काकांनाही (शरद पवारांना) नोटीस, त्यामुळे राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला सल्ला दिला, असं पवार म्हणाले.

मी कुटुंबप्रमुख म्हणून सांगतो, पवार कुटुंबात किंचितही वाद नाही, कुटुंब प्रमुखाचा शब्द महत्त्वाचा असतो, असं  शरद पवारांनी ठणकावून सांगितलं.

ईडीच्या गुन्ह्याबाबत माहिती

पवार म्हणाले, “आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत झाली. ईडीची मला आलेली नोटीस, त्याबाबत सहकाऱ्यांची झालेली प्रतिक्रिया आणि यासंदर्भात पुढील भूमिका याबाबत चर्चा झाली. 24 तारखेला मी जाहीर केलं होतं, पुढील 3-4 आठवडे महाराष्ट्रातील निवडणुकांमुळे राज्यभर जावं लागेल. त्यामुळे ईडीने जो गुन्हा दाखल केला आहे, राज्य सहकारी बँकेबाबतचा. त्या बँकेत किंवा कुठल्याही बँकेत मी सभासद किंवा संचालक नाही. तरीही असा गुन्हा दाखल झाला आणि त्यात माझंही नाव घेण्यात आलं. याबाबत माझी पुढच्या महिन्यात गैरहजेरी असेल त्यामुळे आज जाण्याचं ठरवलं. मी सूचनाही दिली. पण रात्री ईडीचं मला पत्र आलं. तुम्ही 27 तारखेला येण्याची गरज नाही, आवश्यकता असेल तर पूर्वसूचना देऊ”

तरीही मी जाण्याचं ठरवलं होतं. पण मुंबई पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि मला विनंती करुन न येण्याचं आवाहन केलं. मुंबईत संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली.

त्यानंतर मी सहकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबईत शेकडो वाहनांनी कार्यकर्ते येत होते, त्यांना ठिकठिकाणी रोखलं होतं. त्याची माहिती मिळाली. पण परिस्थिती चिघळू नये, म्हणून आम्ही एक पाऊल मागे घेतलं.

कुटुंब प्रमुख म्हणून अजित पवारांच्या राजीनाम्याचं कारण शोधेन

पुण्यातील पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे मुंबई सोडून मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर आणखी एक बातमी आली. अजित पवारांनी राजीनामा दिला. त्यांनी अचानक राजीनामा दिला. त्याबाबतची चर्चा केली नाही. राजीनाम्याची कारणं माहित नव्हती. कुटुंब प्रमुख म्हणून कारणं जाणून घेणं हे माझं कर्तव्य आहे.  आजच त्यांनी कुटुंबात सांगितलं की  सहकारी संस्थामध्ये मी काम करत असतो, ते काम नेटकंच असतं.

अजित पवारांनी राजीनामा देण्याबाबत चर्चा केली नव्हती, त्याची काहीही माहिती मला नव्हती, कुटुंब प्रमुख म्हणून ते जाणून घेणं माझी जबाबदारी होती, म्हणून मी संपर्क साधला, याची माहिती त्यांनी कुटुंबाला दिली : शरद पवार

माझंही नाव ईडीने घेतल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते, ते त्यांनी कुटुंबात बोलून दाखवलं, चौकशीची कोणतीही भीती नसल्याचं त्यांनी सांगितलंय : शरद पवार

राजकारणाची पातळी अत्यंत घसरली आहे, यातून आपण बाहेर पडलेलं बरं असं त्यांनी (अजित पवार) मुलालाही सांगितलंय : शरद पवार

अजित दादांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही, कोणतंही काम हातात घेतलं तर ते पूर्ण करणं हा त्यांचा स्वभाव आहे : शरद पवार

कधीही नोटीस न आलेल्या काकांनाही (शरद पवारांना) नोटीस, त्यामुळे राजकारणात न आलेलं बरं, राजकारणाऐवजी व्यवसाय केलेला बरा, अजित पवारांचा मुलाला सल्ला दिला, असं पवार म्हणाले.

राजकारणात जाऊ नको असं अजित दादांनी मुलालाही सांगितलंय : शरद पवार

माझ्या कुटुंबात कोणताही वाद नाही, माझ्या कुटुंबात कुटुंब प्रमुखाचा निर्णय अंतिम असतो : शरद पवार

मी कुटुंबप्रमुख म्हणून सांगतो, पवार कुटुंबात किंचितही वाद नाही, कुटुंब प्रमुखाचा शब्द महत्त्वाचा असतो : शरद पवार

माझं नाव आल्याने उद्विग्नता आहे हे मला स्पष्ट दिसतंय, पण माझी अजितशी भेट होईल तेव्हा मी कुटुंब प्रमुख म्हणून चर्चा करेन : शरद पवार

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.