पार्थ पवारांसाठी आजोबांची सभा, एक दिवस अगोदरच वडिलांकडून सभास्थळाचा आढावा

पार्थ पवारांसाठी आजोबांची सभा, एक दिवस अगोदरच वडिलांकडून सभास्थळाचा आढावा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा झाली आणि अजित पवार यांचा मावळ मतदारसंघांमध्ये वावर वाढला. त्यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आणि आज त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांनी रविवारी होणाऱ्या पार्थ पवार यांच्या प्रचारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. अजित पवार यांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि शरद पवार यांनीही आजपर्यंत अनेक ठिकाणी सभा घेतल्या, पण त्या सभेच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी कुठेच अजित पवार यांनी हजेरी लावली नव्हती. मात्र त्यांचा मुलगा पार्थ याच्या प्रचारात होणाऱ्या सभेच्या ठिकाणी आदल्या दिवशी येऊन पाहणी केली.

सभेच्या ठिकाणी येऊन पाहणी केल्यामुळे मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मात्र चर्चेचा विषय होता एवढं नक्की. यातून पार्थ पवार यांची निवडणूक पवार कुटुंबीयांनी किती गांभीर्याने घेतली आहे हे दिसून येते. तिकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांचा फोटो टाकत सगळं आलबेल असल्याचं दाखवलं, तर अजित पवार यांनी मात्र आज प्रचारासाठी मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या होमपीच असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आज भेटीगाठी घेतल्या. भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार अजून ठरला नसतानाही राष्ट्रवादीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

Published On - 9:20 pm, Sat, 16 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI