AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्व विरोधकांना भाजप विरोधात एकत्र आणण्याचा पवारांचा अजेंडा – नवाब मलिक

सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा अजेंडा पवारांनी ठरवाला आहे. सुरुवातीला मोजक्या पक्षांसोबत पवारांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र कसं आणलं जाईल त्याबाबत सर्व नेते ठरवतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय.

सर्व विरोधकांना भाजप विरोधात एकत्र आणण्याचा पवारांचा अजेंडा - नवाब मलिक
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 4:13 PM
Share

मुंबई : भाजप आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार सध्या राजधानी दिल्लीत आहेत. पवार यांनी आज सकाळी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत जवळपास दोन तास चर्चा केली. त्यानंतर पवार यांची मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. महत्वाची बाब म्हणजे सर्व विरोधक राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत बोलताना सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा पवारांचा अजेंडा असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. (Sharad Pawar’s agenda is to bring all the opposition together against BJP)

पवार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महत्वाची माहिती दिलीय. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा अजेंडा पवारांनी ठरवाला आहे. सुरुवातीला मोजक्या पक्षांसोबत पवारांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र कसं आणलं जाईल त्याबाबत सर्व नेते ठरवतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय. मंगळवारी पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेससह काही पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

‘भाजपचं सत्तेचं स्वप्न स्वप्नच राहणार’

दरम्यान, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आज पवारांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर ज दिल्लीत किशोर यांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली. निश्चितच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असेल. मात्र, ही भेट राजकीय संदर्भाने असेल असं वाटत नसल्याचं मलिक म्हणाले. महाराष्ट्रात भाजप सत्तेत येण्याची स्वप्न बघत आहेत. पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे काम करत आहे. या सरकारला कुठलिही अडचण येणार नसल्याचा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केलाय.

पवारांच्या अजेंड्याबाबत काँग्रेसची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, शरद पवार राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात 15 विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याबाबत पटोलेंना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी पवार साहेबांचा हा काही पहिला प्रयत्न नाही. ज्या ज्या वेळी राजकीय समीकरण बदलतात, राजकारणात वेगळे वारे वाहू लागतात तेव्हा पवारांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. त्यामुळे यात काही नवीन आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्ष एकवटणार?, पवारांनी 15 पक्षांची बैठक बोलावली; भाजपविरोधात मोर्चेबांधणी सुरू

‘शरद पवारांचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही”, विरोधी पक्षाची मोट बांधण्याच्या पवारांच्या प्रयत्नावर काँग्रेसची प्रतिक्रिया

Sharad Pawar’s agenda is to bring all the opposition together against BJP

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.