AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray | ’16 चे 160 सोडा, 6 तरी….’, शिंदे गटाच्या आमदाराच आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Aaditya Thackeray | सध्या ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी 16 चे 160 आमदार होतील, असा दावा केला आहे. त्यावर शिंदे गटाच्या आमदारने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असही या आमदाराने स्पष्ट केलं.

Aaditya Thackeray | '16 चे 160 सोडा, 6 तरी....', शिंदे गटाच्या आमदाराच आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
aaditya thackeray and eknath shinde
| Updated on: Nov 24, 2023 | 3:19 PM
Share

बुलढाणा (गणेश सोळंकी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. या सुनावणी संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वक्तव्य केलं आहे. “सुनावण्या दोन्ही पक्षांच्या चालू आहेत. मेरीटवर आमच्याकडून निकाल लागेल. आमचा निकाल तोच राष्ट्रवादीचा निकाल. जी संख्या त्यांच्याकडे आहे, तेवढीच आमच्याकडे आहे” असं संजय गायकवाड म्हणाले. शिंदे गटातील आणि अजित दादा गटातील आमदार भाजप मध्ये प्रवेश करतील या संजय राऊत यांच्या दाव्यावर गायकवाड म्हणाले की, “संजय राऊत यांचे आतापर्यंत चे सगळे दावे फेल ठरले. ते जे भविष्यवाणी करतात ,ती कधी खरी ठरली नाही. आता आमचे जाण्यापेक्षा तुमचे किती राहतील?. 31 डिसेंबर पर्यंत आमचे तर कुणी जाणार नाही. पण तुमच्याकडचे आमच्याकडे किती येतील, हे संजय राउत यांनी पाहावं”

आदित्य ठाकरे यांनी 16 चे 160 आमदार होतील, असा दावा केला आहे. त्यावरही संजय गायकवाड यांनी मत नोंदवलं. “16 चे 6 राहतात का, याची काळजी करा. 160 तर कोणाचेच होऊ शकले नाहीत. काँग्रेसचे सुद्धा होऊ शकले नाही. आदित्यने स्वप्न पाहण बंद करावं. 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार. 2024 ची निवडणूक आम्ही तिघेही एकत्र लढणार आणि दोनशे पर्यंत पोहचणार” असा दावा संजय गायकवाड यांनी केला.

‘हा साधा प्रोटोकॉल संजय राऊतला माहिती नाही’

राहुल नार्वेकर दिल्लीच्या आदेशावर काम करतात असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय गायकवाड म्हणाले की, “पक्षासोबत काम करताना वरिष्ठांशी चर्चा करणे, हा पक्षाचा नियम आहे. हा साधा प्रोटोकॉल संजय राऊतला माहिती नाही. काही निर्णय घेताना त्यांनी बाळासाहेबांना विचारले नाही का?. निर्णय घेताना शरद पवारांकडे जात नव्हते का? असा सवाल संजय गायकवाड यांनी विचारला.

Follow Us
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा