Mahajobs | शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त, महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. controversy over Mahajobs portal

Mahajobs | शिवसेनेकडून दिलगिरी व्यक्त, महाजॉब्स जाहिरात वादावर बाळासाहेब थोरातांची रोखठोक भूमिका
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 3:13 PM

मुंबई : महाजॉब्स पोर्टलवरुन महाविकास आघाडीत महाभारत सुरु झालं आहे. महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Mahavikas aaghadi controversy over Mahajobs portal )

महाजॉब्सच्या जाहिरातीत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे फोटो असणे गरजेचे आहे. सरकारचा भाग म्हणून सत्यजीत यांनी ट्वीट केले असेल. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

मुख्यमंत्री आणि आमच्यात संवाद वाढला पाहिजे, गेले काही दिवस कोरोना काळात कमी झाला होता, आता मागील आठवड्यात भेटलो होतो. काही विषयावर चर्चाही झाली, अशी माहितीही थोरात यांनी दिली. (Mahavikas aaghadi controversy over Mahajobs portal )

नेमकं प्रकरण काय?

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत  केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले.

सत्यजीत तांबे यांनी ट्वीट करुन आपली खदखद व्यक्त केली. सत्यजीत तांबे म्हणाले, “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची आणि त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे”. (Satyajeet Tambes question over Mahajobs portal)

राजीव सातव यांचाही आक्षेप

दरम्यान, या जाहिरातीवर काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही आक्षेप घेतला. राजीव सातव यांनी ट्वीट करुन त्यांचं म्हणणं मांडलं. “योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत.

वेबसाईटच्या होमपेजवर तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे फोटो दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेत्यांचे फोटो नसल्याने नाराजी व्यक्त केली असली, तरी http://mahajobs.maharashtra.gov.in या वेबसाईटच्या होमपेजवर डावीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे फोटो आहेत. तर उजव्या बाजूला संबंधित खात्याचे मंत्री म्हणजेच उद्योग मंत्री सुभाष देसाई (शिवसेना), कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) आणि कौशल विकास मंत्री नवाब मलिक (राष्ट्रवादी) यांचे फोटो आहेत.

महाजॉब्स पोर्टल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसापूर्वी म्हणजेच 6 जुलै रोजी “महाजॉब्स” हे संकेतस्थळाचं लोकार्पण केलं. युवकांना रोजगार आणि कंपन्यांना कामगार मिळवण्यासाठी एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे.

संबंधित बातम्या 

Satyajeet Tambe | ‘ती’ योजना आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची?, सत्यजीत तांबेंचा थेट सवाल 

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.