ज्या मतदारसंघात ‘शिवनेरी’ त्या मतदारसंघात गद्दारांना जागा नाही; उद्धव ठाकरेंचा रोख शिंदे गटाच्या कोणत्या नेत्याकडे?

 शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

ज्या मतदारसंघात 'शिवनेरी' त्या मतदारसंघात गद्दारांना जागा नाही; उद्धव ठाकरेंचा रोख शिंदे गटाच्या कोणत्या नेत्याकडे?
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 2:00 PM

पुणे : शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आढळराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेतील काही माणसं ढळली मात्र जे खरे ‘आढळ’ होते, ते अजूनही शिवसेनेसोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिथे शिवनेरी आहे तिथे गद्दारांना जागा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांना इशारा दिला आहे. हिंदुत्वाचा तोतेरी कळस निर्माण करुन बंड पुकारलं जात आहे. मात्र देवाने आपल्याला एक संधी दिली आहे. ही संधी हिंदुत्व टिकवण्याची, हिंदुत्व जोपासण्याची संधी आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं उद्धव ठाकरे यांनी?

उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नेते आढळराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेतील काही माणसं ढळली, मात्र खरे अढळ आजही माझ्यासोबत आहेत.  जिथे शिवनेरी आहे, तिथे गद्दार लोक आढळली नाही पाहिजेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटलांवर केला आहे.

शिवसैनिकांना भावनिक आवाहन

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन देखील केले आहे.  अनेक जण आपल्याला सोडून गेले, मात्र ही देवाने आपल्याला दिलेली एक संधी आहे. ही संधी देशातील लोकशाही टिकवण्याची आहे, ही संधी खरं हिंदुत्व जोपासण्याची, टिकवण्याची, वाढवण्याची संधी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

चंद्रकांत पाटील यांची टीका

दुसरीकडे सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर जी टीका करण्यात आली होती, त्या टीकेचा मंत्री चंद्रकातं पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. 2019 ला तुम्ही सर्वांनी पाहिलं शिवसेनेने कसा विश्वासघात केला असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.