शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदमांनी रुजवली; विनायक राऊतांचा हल्लाबोल; सांगितला नारायण राणेंचा ‘तो’ किस्सा

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. 

शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदमांनी रुजवली; विनायक राऊतांचा हल्लाबोल; सांगितला नारायण राणेंचा 'तो' किस्सा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 11:59 AM

मुंबई :  शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी (Ramdas Kadam) शिवसेनेवर (Shiv sena) केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.  रामदास कदम जे काही बडबड करतात त्याला आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे शिवसेना सोडून जात असतानाचा एक किस्सा देखील सांगितला. जेव्हा नारायण राणे हे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊतांचा हल्लाबोल

विनायक राऊतांनी रामदास कदम  यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना राऊत यांनी म्हटलं की, जेव्हा नारायण राणे हे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा रामदास कदम यांनी त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्काम केला होता. राणे गटात या असं शिवसैनिकांना सांगण्यात कदम हे आघाडीवर होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

रामदास कदम काय म्हणाले होते?

रामदास कदम यांनी शिवसेना आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.  ते नुसतेच आम्हाला खोके सरकार आणि गद्दार म्हणतात, पण त्याऐवजी त्यांनी गेल्या अडीच वर्षात काय केलं ते जनतेला सांगावे असं कदम यांनी म्हटलं होतं. कदम यांच्या या टीकेला आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.