Fact Check: अमित शाहांवर टिका करणारं ते पत्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना लिहिलं की शिवसैनिकानं उद्धवना?

या पत्राच्या माध्यमातून अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. | Uddhav Thackeray

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:24 PM, 10 Feb 2021
Fact Check: अमित शाहांवर टिका करणारं ते पत्र उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना लिहिलं की शिवसैनिकानं उद्धवना?
गुजराती गृहमंत्र्यांना शिवसेना संपवायचेय; उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी शिवसेनेवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक भावनिक पत्र लिहल्याची माहिती समोर आली होती. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. मात्र, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहलेले नसून एका शिवसैनिकाने हे पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचे समजते.  (Gujarati HM dared to finish Shiv Sena Uddhav Thackeray hits back at Amit Shah in letter to Shiv Sainiks)

या पत्रात अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. गुजराती गृहमंत्र्यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेला संपवण्याची भाषा केली आहे. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे.

 पत्रात नेमकं काय आहे?

जय महाराष्ट्र!!!!!!!!!
बाळासाहेबांचा एक शिवसैनिक…

देशाचे गृहमंत्री असणारे श्री. अमित शाह यांनी शिवसेना संपविण्याचे,हे जे वाक्य आहे ते त्यांनी नारायण राणे यांच्या कार्यक्रमात उच्चरले त्या वेळेस नारायण राणे यांना सुद्धा हसू आवरले नसेल.कारण राणे त्यांनी मागील पंधरा वर्ष शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना काही जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना आपल्या गावात बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली.आणि म्हणून अमित शहा असे बोलले असतील, असं मला वाटले.

एक गुजराती माणूस महाराष्ट्रत येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो, आणि नारायण राणेसकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्क्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल.

आता शिवसेनेचे सर्वच विषय काही मराठी माणसाला भले पटत नसतील, पण 19जून 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली,तेव्हा विशेष करून मुंबई आणि लगतच्या ठाणे परिसरात मराठी माणसाची परिस्थिती खूप वाईट होती. भाषांवार प्रांतरचने मुळे मुंबई मराठी माणसाला मिळावी,त्या साठी 105 मराठी माणसे हुतात्मे झाले.

पण मुंबई ची आर्थिक नाडी त्या वेळेस परप्रांतीयांच्या हातात होती. मराठी माणसा कडे तेव्हा कोणतेच उद्योग नव्हते,चांगले शिक्षण नव्हते त्यामुळे सरकारी नोकरीत मराठी माणूस खालच्या पदावर काम करत होताआणि ही सर्व परिथिती बघून वंदनीय बाळासाहेब अस्वस्थ व्हायचे आणि त्यातून जी क्रांती झाली,त्याच नाव शिवसेना तो शिवसेनेचा सर्व इतिहास आपणा सर्वाना माहीतच आहे.

आणि तेव्हा शिवसेना आणि फक्त शिवसेनाच मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर होती, म्हणून आज मराठी माणूस मुंबई शहरात ताठ मानेने उभा आहे, हे कोणीही नाकारू शेकत नाही. आता पिढी बदलत आहे, पण इतिहास मात्र बदलत नसतो.

जय महाराष्ट्र!!

संबंधित बातम्या:

शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार?

(Gujarati HM dared to finish Shiv Sena Uddhav Thackeray hits back at Amit Shah in letter to Shiv Sainiks)