West Bengal Election Results: शरद पवार- तेजस्वी यादवांचं ट्विट, आता संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना फोन

शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र मिळून काम करण्याचे संकेतही दिले आहेत. | West Bengal Election Results 2021

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:17 PM, 2 May 2021
West Bengal Election Results: शरद पवार- तेजस्वी यादवांचं ट्विट, आता संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना फोन
संजय राऊत, शिवसेना खासदार

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये भाजपसमोर ठामपणे पाय रोवून विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamta banerjee)  यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर आता राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. (Shivsena leader Sanjay Raut congratulate Mamta Banerjee)

काहीवेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले. तसेच शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्यासोबत एकत्र मिळून काम करण्याचे संकेतही दिले. यापाठोपाठ शिवसेना नेते संजय राऊत यांनीही दूरध्वनी करुन ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले.

भाजपच्या मेहनतीचं कौतुक, पण ममतादीदींना हरवणं सोपं नाही: संजय राऊत

पश्चिम बंगालचे कल हाती आले आहेत. त्यानुसार बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. बंगालमध्ये भाजपने मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचं कौतुकच आहे. पण ममता बॅनर्जी यांना हरवणं तितकं सोपं नाही, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला होता.

‘पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शाहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल’

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election results) बाजी मारल्यानंतर ममता बॅनर्जी विरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील. तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल, यावर देशाच्या राजकारणाची आगामी वाटचाल अवलंबून असेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

…तर दिल्लीसही हादरे बसू शकतात: संजय राऊत

2 मे नंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लालाही बसू शकतात. तसे वातावरण आज देशात आहे. पश्चिम बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी देशातील सत्तावाद आणि राजकारण संपलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर होईल असे म्हणणाऱ्यांनी दिल्ली स्थिर राहील का, हे सुद्धा पाहावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

संबंधित बातम्या:

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

लाश वही है, बस कफन बदल गया है, बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटलांचं भाष्य

West Bengal Election Results 2021: बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार?; वाचा सविस्तर

(Shivsena leader Sanjay Raut congratulate Mamta Banerjee)