AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीची पहिली मोठी घोषणा, KDMC निवडणूक एकत्र लढवणार!

भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी दिली. (Maha Vikas Aaghadi  Fight KDMC Election together)  

महाविकास आघाडीची पहिली मोठी घोषणा, KDMC निवडणूक एकत्र लढवणार!
| Updated on: Nov 26, 2020 | 2:24 PM
Share

ठाणे : राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने पहिली मोठी घोषणा केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा राष्ट्रवादीने केली. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करु, अशी प्रतिक्रिया जगन्नाथ शिंदे यांनी दिली. (Maha Vikas Aaghadi  Fight KDMC Election together)

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे दोनच नगरसेवक होते. पक्षाला तारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांना जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. आज जगन्नाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मोठ्या संख्येने जमा झाले.

यावेळी शिंदे म्हणाले, “सर्व पद्धतीने पक्षाची बांधणी करायची आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रखडलेल्या विकासकामांना चालना देण्याचा माझा पहिला प्रयत्न आहे. यामध्ये स्वच्छता, रस्ते, पाणी आरोग्य या महत्वाच्या बाबींवर मी जास्त लक्ष देणार आहे”.

राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. शिवसेना, काँग्रेस आाणि राष्टवरादीची आघाडी आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी लढविणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे 14 नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. सगळ्यांना समान न्याय देताना पुन्हा एकदा महापौर आघाडीचा कसा येईल याकडे माझे लक्ष आहे, असं जगन्नाथ शिंदे यांनी सांगितलं.

निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेने दंड थोपटले आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडी सुद्धा त्यांना शह देण्यासाठी चांगली एकता तयार करेल. महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. (Maha Vikas Aaghadi  Fight KDMC Election together)

संबंधित बातम्या : 

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा मार्च 2021 नंतरच, सहकार मंत्र्यांची माहिती

नागपूरमध्ये मास्क न घातल्यास होणाऱ्या दंडाची रक्कम दुप्पट, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.