Shiv Sena: इगो नेमका कुणाचा आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? दिपाली सय्यद म्हणतात, फक्त अडचण आहे ती

Shiv Sena Dipali Sayed : मानअपमान बाजूला सारुन शिंदे गट आणि शिवसेना यांनी एकत्र यावेत असे आवाहन दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.

Shiv Sena: इगो नेमका कुणाचा आहे? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? दिपाली सय्यद म्हणतात, फक्त अडचण आहे ती
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 2:08 PM

Shiv Sena Dipali Sayed : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर (Shiv Sena Rebellion) शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गटावर वागयुद्ध पेटले आहे. शिवसेनेतून शेलक्या शब्दात शिंदे गटाचा समाचार घेण्यात येत आहे. तर शिंदे गटातील अनेक आमदारांनी (MLA) उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांवर तिखट प्रहार केले. त्यांचा रोख आणि रोष संजय राऊत यांच्यावर होता. त्यामुळे दोन्ही गटातील धुसफूस समो अशातच शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद (Shiv Sena Spokesperson Dipali Sayed) यांनी आज पत्रकार परिषद घेत हे दोन्ही गट लवकरच एकत्र येण्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी शिवसेना हे एक कुटुंब आहे. ते तुटता कामा नाही. मी दोन्ही गटांशी बोलले. दोन्ही गटांच्या मनात एकत्र येण्याची भावना असल्याचे स्पष्ट करत नेमकी आडकाठी कुठे आहे यावर भाष्य केले. इगो नेमका कुणाचा आहे? ( Who exactly is the ego?) उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) की एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) ? यावर त्यांनी मत व्यक्त केले. मानअपमान सुरु आहे. एकमेकांना टोचून बोलणे सुरु आहे. शिवसेनेत घरातीलच लोकांनी फूट पाडली आहे. त्यामुळे यामध्येच सर्व आले.उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी एकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही गटातील अनेक नेत्यांशी त्या संपर्कात असून दोन्ही गट एक दोन दिवसात एकत्र येतील असे वक्तव्य ही त्यांनी केले.

शिवसेनेत फूट नको होती

आपण सातत्याने मनातील इच्छा, भावना ट्विटच्या माध्यमातून मांडतो. दरम्यान आपण दोन्ही गटातील नेत्यांशी भेटी गाठी घेतल्या. शिवसेनेत फूट नको होती. शिवसेनेत दोन गट नसावेत. मानअपमानााची भावाना प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येकाला एकत्र यायचे आहे. असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याविषयीची त्यांची भावना व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

घोडं अडल मान अपमानात

यावेळी प्रत्येक शिवसैनिकाला बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून मी बोलत असते. तुटलेलं घर एकत्रं यावं असं वाटलं म्हणून बोलले. ते बोलण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. माझ्यावर कारवाईचा प्रश्नच नाही. कारण मी फक्त मध्यस्थीची भावना व्यक्त केली. ते लोक मोठे आहेत. ते आज वेगळे आहेत ते उद्या एकत्रं येतील. त्यांनी बोलावं. तरच ते एकत्र येतील असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शिवसैनिकाने, नेत्याने याप्रश्नावर बोलण्याचे आवाहन त्यांनी केले. केसरकर आणि शहाजी बापू पाटील या सर्वांना एकत्रं यायचं आहे. पण कुणी पुढाकार घेत नाही. मान अपमानात हे सर्व अडकलं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.