Gulabrao Patil : ‘चहापेक्षा किटली गरम’ गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना सभागृहातून डिवचलं!

Gulabrao Patil : हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेऊ नये म्हणून आम्ही हा उठाव केला, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Gulabrao Patil : 'चहापेक्षा किटली गरम' गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना सभागृहातून डिवचलं!
गुलाबराव पाटील, आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 2:54 PM

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात अनपेक्षित बदल झालेत. शिवसेनेत उभी फूट पडली अन् शिंदे गटानं उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं. जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आमदारांची नावं समोर आली तेव्हा अनेक आश्चर्यकारक नावं समोर आली त्यातलंच एक नाव म्हणजे गुलाबराव पाटील… ज्या गुलाबराव पाटलांनी कायम शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली. त्याच गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या सावलीत जाताच शिवसेनेवर आणि विशेषत: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला. चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात, हे कोण सहन करणार आहे!, असंही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणालेत.

“आम्ही बंड केलेलं नाही”

“आम्ही बंड केलं नाही. आम्ही उठाव केला आहे. आम्ही बंड बिलकूल केलं नाही. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत होऊ नये म्हणून आम्ही हे केलं. गुलाबराव तुला टपरीवर पाठवील. धिरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. मुख्यमंत्रीही रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे. ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वाला बाळासाहेबांनी निवडून आणलं. आमच्या प्रारब्धात बाळासाहेबांनी लिहिलं एक दिवस तुम्ही आमदार व्हा. आम्ही शिवसेना सोडली नाही. त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता काळजी करू नका. आमच्या पेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे. ५५ आमदारावरून ४० आमदार कसे काय फुटताहेत. ४० आमदार जेव्हा फुटतात ही काही आजची आग नाही. आमचं घर सोडून येम्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना दुख देण्याची इच्छा नाही. त्यांच्या मुलाला दुख देण्याची इच्छा नाही. टी बाळू म्हणणाऱ्यांसोबत बसावे लागले तुमच्यामुळे”, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

वर्षवर्ष जेलमध्ये राहिलोय…

काही लोक म्हणतात आमच्या नजरेला नजर भिडवली नाहीये. वर्ष वर्ष जेलमध्ये राहिलेलो ३०२ ३०७ भोगलेले लोक आहोत. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हातात घेऊन जय भवानी जय शिवाजी करत इथपर्यंत पोहोचलेले लोकं आहोत आम्ही तडीपार झालेले लोक आहोत आम्ही. नजर नजर मे रहना भी कमाल होता है, नफस नफस मे भी करना कमाल होता है बुलंदीओ पर पोहोचना कमाल नही, बुलंदीओ पर ठहरना कमाल होता है, असं म्हणत पाटलांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.