केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अभिनेत्री कंगना रनौतवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम, शिवसेनेचा मोदी सरकारला टोला

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून अभिनेत्री कंगना रनौतवर कारवाई करण्याची मागणी केली आहे (Pratap Sarnaik demand action against Kangana Ranaut). कंगना रनौतने मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केलीय. या पत्रात त्यांनी सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज प्रकरणाचाही तपास करण्याची मागमी केली आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले, “कंगना रनौत मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना तालिबान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरशी करत असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे. याबाबत मी विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिलं होतं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील अनेक ड्रग्जचे धागेदोरे समोर येत आहेत. कंगनाने अनेक फिल्म स्टारवर ड्रग्जचे आरोप केलेत आणि त्या फिल्स स्टारने देखील कंगना ड्रग्जच्या आहारी गेल्याचे आरोप केले होते. त्यामुळे मी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केलीय.”

हेही वाचा : पोलिसांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित, कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही : अनिल देशमुख

शिवसेनेने सुरुवातीपासून कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली. विधानसभा अध्यक्षांनी गृहमंत्र्यांना 24 तासात याबाबत भूमिका घ्यावी असे निर्देश दिले आहेत. तसेच पुढील 24 तासात या प्रकरणी अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

“केंद्राचं देशातील समस्यांवर नव्हे, कंगनावर जास्त प्रेम”

शिवसेनेने यावेळी भाजप आणि मोदी सरकारवरही निशाणा साधला. केंद्र सरकारचं देशातील समस्यांवर नव्हे, तर कंगनावर जास्त प्रेम असल्याचं म्हणत शिवसेनेने मोदी सरकारला जोरदार टोला लगावला.

“मी पहिल्यांदाच म्हणालो होतो कंगना रनौत भाजपच्या पोपट”

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर म्हणाले, “महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नसणारे महाराष्ट्र द्रोही आता देशभक्त. वारे वा कंगना रनौत. आता त्यांना Y काय Z सुरक्षा द्यायला पाहिजे. मी पहिल्यांदाच म्हणालो होतो कंगना रनौत या भाजपच्या पोपट आहेत. ते भाजपच्या मुखातील बोलत आहेत.”

दुसरीकडे कंगना चित्रपट सृष्टीला देखील धार्मिक रंग देत आहे. अशा गोष्टी सहन करायला नको. अशा व्यक्तींना महाराष्ट्रातून बाहेर हकलून दिलं पाहिजे, असं मत आमदार आबु आझमी यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

कंगनाच्या मदतीला केंद्र सरकार, Y+ दर्जाची सुरक्षा, कंगनाकडून अमित शाहांचे आभार

महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा, कंगनाचा एल्गार, थोबाड फोडणार, शिवसेनेचा पलटवार

संबंधित व्हिडीओ :

Pratap Sarnaik demand action against Kangana Ranaut

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *