VIDEO : भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली

माझ्या जवळ येऊन दाखव. तुला संजय गायकवाड दाखवतो काय आहे, असे थेट आवाहन संजय गायकवाड यांनी केले. (Sanjay Gaikwad criticize Sanjay Kute)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:08 AM, 19 Apr 2021
VIDEO : भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली
भाजप आमदार संजय कुटे आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड

बुलडाणा : संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असे खुले आवाहन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले. ते बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत भाजप आमदार संजय कुटे यांच्यावर टीका केली. (Shivsena MLA Sanjay Gaikwad again criticize bjp MLA Sanjay Kute)

शिवसेना आमदार संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही.

मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का?

सर्व भारतातील लोक एका पक्षातील आहेत का? यात सर्व धर्मातील सर्व पक्षातील लोक आहेत. मग या राज्यात केवळ मुख्यमंत्री आपला नाही, म्हणून अडवणूक करता. पाकिस्तान, बांगलादेश यांना पुरवता. पण भारताला पुरवत नाही. उत्तरप्रदेशात तुम्ही रेमडेसिव्हीर फुकट वाटता. पण महाराष्ट्राला जनतेला तुम्ही मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी केला आहे.

ज्या भाजपने आणि संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो. त्याला सर्व शौक आहे. तो मला मवाली आहे. अरे हरामखोर पुतळे काय जाळतो. तुझ्या मायने दूध पाजलं असेल तर 50 मीटर माझ्या जवळ येऊन दाखव. तुला संजय गायकवाड दाखवतो काय आहे, असे थेट आवाहन संजय गायकवाड यांनी केले.

भाजपच्या सर्व लोकांविरुद्ध तक्रार करणार

पुतळे जाळले म्हणजे काय मोठं केलं का, मी जी भावना मांडली ती सर्व जनतेची आहे. हा महाराष्ट्र जिजाऊ-शिवरायांचा आहे. ज्या महाराष्ट्रातील शिवरायांचे वंशज जर तुम्ही मारत असाल, तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तुम्ही माझी काय तक्रार करता, मीच भाजपच्या सर्व लोकांविरुद्ध तक्रार करतो. या भाजपमुळे राज्यातील लोक मरु लागले आहेत तुम्ही काय आंदोलन करता? तुमच्या या प्रवृत्तीमुळे माझा महाराष्ट्र मरतो आहे. माझी लोक मरत आहेत. याला तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही काय उपोषण करता मीही आंदोलन करेन, असेही संजय गायकवाड म्हणाले. (Shivsena MLA Sanjay Gaikwad again criticize bjp MLA Sanjay Kute)

संबंधित बातम्या : 

Video: आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर; नितेश राणेंचा शिवसेना आमदारावर पलटवार

VIDEO : मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली