AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गरम्य गोवा भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत, राज्यपाल मलिक यांनी ‘झाकली मूठ’ उघड केली : संजय राऊत

गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच कोव्हिड काळात गोवा भाजप सरकारने मोठा झोल केल्याचा आरोपही मलिक यांनी केला. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनामधून गोव्याच्या भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे.

निसर्गरम्य गोवा भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत, राज्यपाल मलिक यांनी 'झाकली मूठ' उघड केली : संजय राऊत
SANJAY RAUT
| Edited By: | Updated on: Oct 27, 2021 | 7:32 AM
Share

मुंबई : गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच कोव्हिड काळात गोवा भाजप सरकारने मोठा झोल केल्याचा आरोपही मलिक यांनी केला. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामनामधून गोव्याच्या भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे. भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करुन ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली, असा टोमणा अग्रलेखातून मारला आहे.

राज्यपालांना फाईल्सवर सही करण्यासाठी 300 कोटींची लाच?

देशातील कोरोना विषाणूचा धुमाकूळ बराच कमी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा मात्र खाली बसायला तयार नाही. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एक आरोप ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे. दुसरा आरोप गोव्याच्या भाजप सरकारविरोधात आहे. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना दोन ‘महत्त्वा’च्या फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देऊ केली गेली होती. मात्र आपण ते दोन्ही व्यवहार रद्द केले, असा दावा मलिक यांनी राजस्थानमधील एका मेळाव्यात बोलताना केला आहे.

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यानेच मलिकांना गोव्यातून हटवलं?

मलिक यांनी हा ‘गौप्यस्फोट’ दोन वर्षांनंतर का केला, हा प्रश्न विचारला जात आहे. मात्र मलिक हे सडेतोड बोलण्यासाठी ओळखले जातात, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. आता जम्मू-कश्मीरच्या कार्यकाळातील गौप्यस्फोटाचे काय होणार, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. खरा प्रश्न आहे तो सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील भाजप सरकारबाबत केलेल्या गंभीर आरोपांचा. गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार होत असून यासंदर्भात आवाज उठविल्यामुळेच मला तेथून हटविण्यात आले, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केवीलवाणी

गोवा सरकारने राबविलेली ‘घर-घर रेशन’ ही योजना अव्यवहारी होती. एका कंपनीच्या सांगण्यावरून ती राबवली गेली, असाही आरोप मलिक यांनी केला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात गोव्यातील भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले, असा ठपका मलिक यांनी ठेवला आहे. भाजपची मंडळी मलिक यांचे हे आरोप फेटाळणार, हे तर उघड आहे. परंतु गोव्याबाबत त्यांनी जी विधाने केली आहेत, त्याबाबत शंका उपस्थित होण्याचे काहीच कारण नाही. कारण विद्यमान भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था सर्वच क्षेत्रांत केविलवाणी झाली आहे.

गोव्यातील भाजप सरकार कॅसिनो मालकांचे गुलाम

तेथील सरकारविरोधात जनमानसात तीव्र संताप आहे. कोरोनाची परिस्थिती या सरकारने नीट हाताळली नाही हे तर आहेच, पण तेथील आरोग्य यंत्रणा साफ कोसळून पडली आहे. कोरोनामुळे गोव्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनावरच कुऱ्हाड पडली. त्यामुळे राज्याचे अर्थकारण जसे बिघडले तसे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. लोकांच्या चुली थंडावल्या. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अमली पदार्थांचा गोव्याभोवती पडलेला विळखा कमी होण्याऐवजी घट्टच होत चालला आहे. गोव्यातील भाजप सरकार कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे.

गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले

कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह गडद करणाऱ्या घटना गोव्यात सातत्याने घडत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चालली आहे. गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणार, अशी थापेबाजी करीत आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ नावाचा एक पडेल प्रयोगही त्यांनी मध्यंतरी करून पाहिला. त्यामुळे गोव्याचे वास्तव झाकले जाईल, असे त्यांना वाटले असावे. वास्तविक भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे.

मलिकांच्या सत्यकथनाने गोव्याची दुरवस्था चव्हाट्यावर

एका भयंकर दुरवस्थेच्या गर्तेत फेकले गेले आहे. ही ‘झाकली मूठ’ अशीच राहावी, यासाठी तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत वेगवेगळी स्टंटबाजी करीत आहेत. मात्र गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करून ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली. भाजप सरकारच्या भ्रष्टाचारापासून कोरोना स्थिती हाताळण्यातील गलथान कारभारापर्यंत मलिक स्पष्ट बोलले आहेत. गोवेकर जनता तर रोजच त्याचा अनुभव घेत आहे. मलिक यांच्या ‘सत्य’कथनाने गोव्याची सर्वच पातळ्यांवर झालेली दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली इतकेच!

(Shivsena Sanjay Raut Slam BJP Goa Pramod Sawant through Saamana Editorial over Governor Satyapal Malik Allegation)

हे ही वाचा :

माथेरानच्या 10 नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती, निकाल कधी लागणार?

‘तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला’, वानखेडे प्रकरणात चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.