‘अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षेंना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवू नये’

शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडीने उमेदवारी देऊ नये. | Sharad Ponkshe

'अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षेंना शिवसेनेने विधान परिषदेत पाठवू नये'
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 5:21 PM

मुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून शिवसेनेने अभिनेते शरद पोंक्षे यांची निवड करू नये, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली. शरद पोंक्षे यांना महाविकासआघाडीने उमेदवारी देऊ नये. अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य शरद पोंक्षे यांनी मध्यंतरी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करत सचिन खरात यांनी महाविकासआघाडी सरकारकडे पोंक्षे यांना विधान परिषदेत न पाठवण्याची मागणी केली आहे. (Shivsena should not nominate sharad ponkshe for governor appointed MLC)

महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या जागा भरण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात शुक्रवारी वर्षा बंगल्यावर चर्चाही झाली होती. या बैठकीत राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची नावे निश्चित झाल्याचे समजत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 जणांची यादी सुपूर्द करतील, असा अंदाज आहे.

यापैकी शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. कालच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या कोट्यातील आणखी तीन जागा शिल्लक आहेत. राज्यपाल नामनिर्देशित सदस्यपदासाठी कला, नाट्य किंवा अन्य क्षेत्रात लक्षणीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा प्राधान्याने विचार केला जातो.

त्यामुळे शिवसेनेकडून अभिनेता शरद पोंक्षे यांचे नावही चर्चेत आहे. अलीकडच्या काळात भाजपकडून शिवसेनेला सातत्याने हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचे समजते. मात्र, महाविकासआघाडील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना हे नाव चालणार आहे का, हादेखील कळीचा प्रश्न आहे. कारण, सावरकर मुद्द्यावरुन शरद पोंक्षे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी नेहमीच मतभेद राहिले आहेत.

संबंधित बातम्या:

उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठावंत शिवसैनिकांचं काय होणार?; दरेकरांचा सवाल

उर्मिला मातोंडकरांकडून शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार; सूत्रांची माहिती

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली; वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

(Shivsena should not nominate sharad ponkshe for governor appointed MLC)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.