उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठावंत शिवसैनिकांचं काय होणार?; दरेकरांचा सवाल

पण निष्ठावंत शिवसैनिकांचं काय?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (Pravin darekar on Urmila Matondkar Vidhan Parishad MLC)

उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठावंत शिवसैनिकांचं काय होणार?; दरेकरांचा सवाल
Pravin Darekar

मुंबई : शिवसेनेने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. विधान परिषदेची उमदेवारी कुणाला द्यावी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण निष्ठावंत शिवसैनिकांचं काय?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (Pravin darekar on Urmila Matondkar Vidhan Parishad MLC)

“शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देत आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. परंतु जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, जे शिवसैनिक पक्षासाठी रस्त्यावर उतरतात, त्यांचं काय? अशाप्रकारे इतरांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांकडे दुर्लक्ष होत आहे”, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.

‘वरळीसारख्या ठिकाणी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडली. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांचा विचार होयला हवा होता. मूळ शिवसैनिकांचं काय होणार हा प्रश्न समोर येतो, त्यांचा विचार होण्याची आवश्यकता आहे”, असेही मत त्यांनी व्यक्त केले.(Pravin darekar on Urmila Matondkar Vidhan Parishad MLC)

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना रानौतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवत असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती.

संबंधित बातम्या : 

विधान परिषद : उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत, आम्हाला त्याबाबत कल्पना नाही : अनिल परब

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI