बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेते सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. | Balasaheb Thackeray

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विट, म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 11:19 AM

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेते सोशल मीडियावर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी कोटी कोटी अभिवादन..,  असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Balasaheb Thackeray death anniversary)

[svtimeline][/svtimeline][svt-event title=”‘असा मोहरा कधी न जाहला’, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राऊतांकडून दंडवत, पवार-खडसेंचीही आदरांजली” date=”17/11/2020,10:55AM” class=”svt-cd-green” ] हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षाचे नेते बाळासाहेबांच्या आठवणी जागवत आहेत तसंच त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘असा मोहरा कधी न जाहला’, असं म्हणत आपल्या शीर्षस्त नेत्याला साष्टांग दंडवत घातला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मंत्रालयावर भगवा, बाळासाहेबांचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु: छगन भुजबळ” date=”17/11/2020,10:58AM” class=”svt-cd-green” ] आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलो आहे. यावर्षी मंत्रालयावर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले. बाळासाहेबांचे आणखी एक स्वप्न होते. मराठी माणूस एक पाऊल पुढे गेला पाहिजे. ते स्वप्नही आम्ही लवकरच पूर्ण करू, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांकडून बाळासाहेबांना मानवंदना” date=”17/11/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे अमोघ वक्ता, व्यंगचित्रकार व राजकीय भाष्यकार म्हणून कार्यकर्तृत्वही विशेष महत्त्वाचे होते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजिगीषु वृत्तीचे प्रकर्षाने स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. पुण्यतिथी दिनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. [/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी” date=”17/11/2020,11:01AM” class=”svt-cd-green” ] दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये येणार आहेत. [/svt-event]

संबंधित बातम्या:

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? संदीप देशपांडेंचं टीकास्त्र

Balasaheb Thackeray death anniversary LIVE | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

(Balasaheb Thackeray death anniversary)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.