बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? संदीप देशपांडेंचं टीकास्त्र

स्मारक की मातोश्री तीन?? असा खोचक सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे. (MNS Sandeep Deshpande on Balasaheb Thackeray Memorial at mayor bunglow)

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं का वापरलं जातं? संदीप देशपांडेंचं टीकास्त्र
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 10:12 AM

मुंबई : “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथील नियोजित स्मारकासाठी फक्त जागा घेतली आहे. मात्र अद्याप त्या ठिकाणी स्मारक का उभारलेले नाही?,” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने स्मारकावरुन संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. स्मारक की मातोश्री तीन?? असा खोचक सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे. (MNS Sandeep Deshpande on Balasaheb Thackeray Memorial at mayor bunglow)

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर भव्य स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी महापौर बंगला हँडओव्हर करण्यात आला. मात्र अजूनही तो बंदिस्त आहे. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? फक्त 23 जानेवारी आणि 17 नोव्हेंबर आलं की टेंडर काढलं आहे, त्याचं काम सुरु आहे हेच सांगितलं जातं. पुढे त्याचं काय झालं काहीही समजत नाही,” अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.

“जर खरोखर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदिस्त का आहे? ते सर्वसामान्यांसाठी खुलं का नाही? जनता तिथे का जाऊ शकत नाही? कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं ते का वापरलं जातं? असे प्रश्नही संदीप देशपांडेंनी केले आहेत.

दरम्यान शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. त्यामुळे महापौर बंगला रिकामा करण्यात आला होता. महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील वीर जीजामाता उद्यानात स्थलांतरित करण्यात आले आहे. या नियोजित स्मारकासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र स्मारकासाठी प्राथमिक टप्प्यात 87 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं सांगितले जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 8 वा स्मृतीदिन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 8 वा (17 नोव्हेंबर 2020) स्मृतीदिन आहे. दरवर्षी या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जाऊन त्यांना अभिवादन करत असतात. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने गर्दी करू नका, संयम पाळा, जेथे आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत आहे. (MNS Sandeep Deshpande on Balasaheb Thackeray Memorial at mayor bunglow)

संबंधित बातम्या :  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिन, शिवतीर्थावर गर्दी न करण्याचे आवाहन

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.