AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं तर सिद्धरमय्या होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर डी.के.शिवकुमार उपमुख्यमंत्री, 18 मे रोजी शपथग्रहण ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस हायकमांडने बुजुर्ग नेते सिद्धरमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी डी.के.शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

ठरलं तर सिद्धरमय्या होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर डी.के.शिवकुमार उपमुख्यमंत्री, 18 मे रोजी शपथग्रहण ?
siddaramaiahImage Credit source: socialmedia
| Updated on: May 14, 2023 | 9:21 PM
Share

मुंबई : कर्नाटकात कॉंग्रेसला घसघसीत यश मिळूनही मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची यावरून पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री पदासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नेते सिद्धरमय्या यांची निवड हायकमांड यांनी केली आहे. ते कुरूबा समुहाचे असल्याने त्यांच्या नाववर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. साल 2024 रोजी असलेल्या लोकसभा निवडणूकाच्या पाश्वभूमीवर कॉंग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थित नसल्याने सिद्धरमय्या यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू लोकप्रियतेत जरी सिद्धरमय्या पुढे असले तरी पक्षात डी.के. शिवकुमार यांना 70 हून अधिक आमदारांचा पाठींबा आहे. त्यामुळे आता या संकटातून कॉंग्रेस त्यांची कशी मनधरणी करतात यावर सर्व विसंबून आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कॉंग्रेस हायकमांडने बुजुर्ग नेते सिद्धरमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी डी.के.शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. शिवकुमार साल 2024 पर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळतील. त्यांना महत्वाची खातीही देण्यात येणार आहेत. मात्र या निर्णयाने डी.के. शिवकुमार यांचे समर्थक बिथरले आहेत.

ईडी चौकशीचा ससेमिरा

शिवकुमार याआधीच ईडी चौकशीचा ससेमिरा लागल्याने कॉंग्रेस भाजपाला आयता मुद्दा देण्याच्या विचारात नसल्याचे समजते. त्यामुळे शिवकुमार यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. त्यांना आता उपमुख्यमंत्री पद आणि महत्वाची खाती देऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोण आहेत सिद्धरमय्या ?

कर्नाटकात जसा कॉंग्रेसला बहुमताकडे वाटचाल सुरू झाली तसे मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरमय्या यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. सिद्धरमय्या यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. 75 वर्षीय सिद्धरमय्या यांनी कर्नाटक मुख्यमंत्री म्हणून याआधी जबाबदारी पार पाडली असल्याने त्यांना सरकार चालविण्याचा अनुभव आहे.

सिद्धरमय्या यांचा जन्म 12 ऑगस्ट 1948 साली म्हैसूर जिल्ह्यातील सिद्दरामनहुंडी गावात झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिद्धरमय्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत शाळेत जाऊ शकले नाहीत. नंतर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून विज्ञान विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी कायद्याचाही अभ्यास केला आहे.

साल 1980 ते 2005 पर्यंत ते जनता दलाचे सदस्य होते. कॉंग्रेसचे कट्टर विरोधी होते. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी त्यांची जनता दल ( एस ) मधून हक्कालपट्टी केली. त्यानंतर कॉंग्रेसमध्ये ते सामील झाले. 1983 मध्ये ते प्रथम आमदार झाले नंतर 1985 मध्ये कॉंग्रेसचे सरकार आले तेव्हा ते मंत्री झाले. तर 2004 मध्ये कॉंग्रेस – जनता दल ( एस ) सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री बनले. कुरुबा समुदायाचे मोठे नेते झाल्यानंतर ते 2013 ते 2018 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहीले. ते नास्तिक असल्याने त्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ सत्याला स्मरून घेतली होती.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.