AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इकडं युतीचे वारे तिकडं कार्यकर्त्यांत वेगळाच उत्साह, पुण्यात आदित्य-राज ठाकरेंचे एकत्र बॅनर!

ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे असे असतानाच पुण्यात मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो आहे.

इकडं युतीचे वारे तिकडं कार्यकर्त्यांत वेगळाच उत्साह, पुण्यात आदित्य-राज ठाकरेंचे एकत्र बॅनर!
aditya thackeray and raj thackeray
| Updated on: Jun 09, 2025 | 3:52 PM
Share

राज्यात सध्या युती आणि आघाड्यांचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांचे एकत्रिकरण होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे दोन्ही गट एकत्र आले तर चांगलेच होईल, असे मत या दोन्ही गटांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हो दोन्ही बंधूंच्या युतीच्याही चर्चा आहेत. असे असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांत एक नवा उत्साह संचारला आहे. त्याची प्रचिती पुणे येथे आली आहे. राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

पुण्यात चौका-चौकात झळकले बॅनर्स

महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसैनिक तसेच मनसे सैनिकांत या संभाव्य युतीबाबत मोठी उत्सुकता आहे. त्याचीच प्रचिती पुण्यात आली. येथे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकाकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा देण्यात आला आहेत. आज (9 जून) राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. असे असताना पुण्यातील शिवसैनिकांकडून चौका-चौकामध्ये आदित्य ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची आतापासूनच मनाची तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडतंय? दोन्ही पक्ष एकत्र येणार का?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांतील काही नेत्यांनी याला युतीला समर्थन दिले आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच होईल. संपूर्ण महाराष्ट्रालाही ते एकत्र यावेत असे वाटते, अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर आता भूतकाळात डोकावून पाहायचं नाही. समोर भविष्यकाळाकडे पाहायचं असं म्हणत उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत, असं थेट आणि उघडपणे बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या नातेवाईकांमार्फत या युतीबाबत चर्चा चालू आहे, असं सूत्रांनी सांगितलं होतं. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.