सोलापुरात शिवसेना नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण

सोलापुरात शिवसेना नेत्यांच्या स्वागतासाठी अक्षरश: नोटांची उधळण करण्यात आली. शिवसेनेचे सोलापूर प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागत मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी नोटा उडवल्याचा संतापजनक प्रकार घडला.

, सोलापुरात शिवसेना नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण

सोलापूर : सोलापुरात शिवसेना नेत्यांच्या स्वागतासाठी अक्षरश: नोटांची उधळण करण्यात आली. शिवसेनेचे सोलापूर प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागत मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी नोटा उडवल्याचा संतापजनक प्रकार घडला. शिवसेनेच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी या नोटा उधळल्या. मात्र, याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, असं स्पष्टीकरण पुरुषोत्तम बरडे यांनी दिलं. तसेच,

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख ठोंगे पाटील यांच्या जागी प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सोलापुरात पुरुषोत्तम बरडे यांच्यासाठी स्वागत मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच स्वागत मिरवणुकीत कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार घडला.

“उत्साहाने किंवा कोणी खोडसाळपणे असा प्रकार केला असेल तर मला माहित नाही. आम्ही मर्द मावळे असल्याने हातात तलवार घेऊन पुढे जातो. पैसे उडवायला हे काही डान्स बार नाही. पैसे कुणी उडवले याबाबत मला काहीही कल्पना नाही, असं स्पष्टीकरण पुरुषोत्तम बरडे यांनी दिलं. मात्र, अशाप्रकारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण केल्याने सोलापुरातील राजकारणात नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *