सरकारकडून मेंटल टॉर्चर : प्रणिती शिंदे

सत्ताधाऱ्यांकडून देशभरात दबाव येत आहे. आमच्यावर मेंटल टॉर्चर केलं जातं. मात्र आम्ही त्याला न जुमानता लढा देणार, असं काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सरकारकडून मेंटल टॉर्चर : प्रणिती शिंदे

सोलापूर : जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा सरकारकडून आवाज दाबला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मेंटली टॉर्चर (Praniti Shinde on BJP) केलं जात आहे, असा आरोप सोलापुरातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसात हजेरी लावल्यानंतर प्रणिती यांनी सरकारवर ताशेरे (Praniti Shinde on BJP) ओढले.

‘कितीही गुन्हे नोंदवले गेले, तरी गोरगरीबांसाठी मी लढा देतच राहणार. सत्ताधाऱ्यांकडून देशभरात दबाव येत आहे. आमच्यावर मेंटल टॉर्चर केलं जातं. मात्र आम्ही त्याला न जुमानता लढा देणार. कायद्याच्या चौकटीत राहून लढा देणार, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे (Praniti Shinde on BJP) यांनी दिली.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आज सोलापूरच्या सदर बाजार पोलिसात हजेरी लावली. पुढील दोन दिवस त्यांना पोलिस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे.

सोलापुरात 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील महागलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भात दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी (Praniti Shinde on BJP) करत पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात आला.

आमदार प्रणिती शिंदेंविरोधात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

यावेळी बंदोबस्तास उपस्थित असलेल्या पोलिसांबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली. या धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला.

सदर बाजार पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे आणि गुन्हे दाखल झालेल्या इतर जणांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोप सादर केलं. यासंदर्भात सोलापूर जिल्हा न्यायालयात तारीख होती. न्यायालयाने दिलेल्या तारखेला आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे हे हजर राहिले नाही.

जामीनपात्र वॉरंट काढल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे या न्यायालयात हजर राहिल्या. त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला, मात्र त्यांना तीन दिवस पोलिस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *