राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन, दहा दिवसात कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले

सोलापूरमधील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान राजूबापू पाटील यांचे निधन झाले.

राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन, दहा दिवसात कुटुंबातील तिघांना काळाने हिरावले
Follow us
| Updated on: Aug 13, 2020 | 1:04 PM

पंढरपूर : राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजूबापू पाटील यांचे निधन झाले. कोरोनाच्या संसर्गानंतर राजूबापू पाटील यांची प्राणज्योत मालवली. दहा दिवसात पाटील यांच्या कुटुंबातील तिघांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Solapur NCP Leader Raju Bapu Patil dies of Corona)

राजूबापू पाटील यांचे सोलापूरमधील खासगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. पंढरपूर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पाटील यांच्या कुटुंबातील चुलते, धाकटे बंधू महेश पाटील आणि आता राजूबापू यांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यामुळे पाटील कुटुंबासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

राजूबापू पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले होते, मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते.

राजूबापू पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जात. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या माध्यमातून त्यांनी ठसा उमटवला होता. नुकताच गूळ कारखाना काढून त्यांनी ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

शरद पवार यांच्या शिफारशीवरुन आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी राजूबापू पाटील यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांचे वडील यशवंतभाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्ष रयत शिक्षण संस्थेचे सदस्यपद भूषवले होते. राजूबापू पाटील यांच्या निधनाने राजकीय नेत्यांपासून समर्थकांनी शोक व्यक्त केला आहे. (Solapur NCP Leader Raju Bapu Patil dies of Corona)

संबंधित बातम्या :

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, अजित पवार हळहळले

(Solapur NCP Leader Raju Bapu Patil dies of Corona)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.