…जेव्हा मंत्र्यांची पत्नी कामवाल्या बाईंच्या घरात चुलीवर स्वयंपाक करते!

मंत्री म्हटलं किंवा मंत्र्याचं कुटुंब म्हटलं की मोठेपणा... बडेजाव... सगळा कार्यक्रम अगदी कसा थाटात पण या सगळ्याला तनपुरे कुटुंब अपवाद आहेत. | Sonali Tanpure wife of Minister of State Prajakt Tanpure

...जेव्हा मंत्र्यांची पत्नी कामवाल्या बाईंच्या घरात चुलीवर स्वयंपाक करते!
Sonali Tanpure
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 7:53 AM

मुंबई : मंत्री म्हटलं किंवा मंत्र्याचं कुटुंब म्हटलं की मोठेपणा… बडेजाव… सगळा कार्यक्रम अगदी कसा थाटात पण या सगळ्याला तनपुरे कुटुंब अपवाद आहेत. वागण्या-बोलण्यात असलेला गोडवा आणि सर्वसामान्यांची जुळालेली नाळ तनपुरे कुटुंबाला आणखीनच मोठं करते. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी आपण मंत्र्याची बायको आहोत हे विसरुन त्यांच्या घरच्या कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. त्यांच्या या साधेपणाची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. (Sonali Tanpure wife of Minister of State Prajakt Tanpure went to the house of a maid woman and cooked)

सोनाली तनपुरे यांनी ट्विटरवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून आमच्या घरी काम करणाऱ्या संगीता वेताळ यांच्या घरी जाऊन आज चुलीवर जेवण बनवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अचानकपणे हे दृश्य पाहणाऱ्या मंत्री प्राजक्त यांनाही धक्का बसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मंत्र्याचं घर म्हटलं नोकर-चाकरांचा राबता असतो. मालकीणबाईंनी फक्त ऑर्डर सोडायची पुढच्या काही क्षणात ती गोष्ट त्यांना मिळते. परंतु तनपुरे कुटुंब अगदीच याला अपवाद आहेत. सोनाली तनपुरे यांनी कामवाल्या बाईंच्या घरी जाऊन चुलीवर स्वयंपाक केला. आपल्या घरात काम करते म्हणून काय झालं, शेवटी त्यांच्याही कामाला मोल आहेच की… आणि त्यांनाही आपल्या समान वागवलं पाहिजे, अशी त्यापाठीमागची भावना…!

कोण आहेत सोनाली तनपुरे…?

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तर सोनाली तनपुरे या राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी आहेत. राजकारणाशिवाय सोनाली यांचा समाजकारणात ओढा आहे. राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांशी सोनाली तनपुरे जोडल्या गेलेल्या आहेत.

जेव्हा मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईला असतात किंवा विविध दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बाहेर असतात तेव्हा सोनाली तनपुरे या जनतेचे प्रश्न समजावून घेऊन प्राजक्त यांच्या कानावर घालत असतात. एकूणच प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहाचा सोनाली एक अविभाज्य भाग आहेत.

(Sonali Tanpure wife of Minister of State Prajakt Tanpure went to the house of a maid woman and cooked)

हे ही वाचा

मंत्रालयाबाहेर अंधारातच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचा ‘जनता दरबार’

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार, आव्हाड सोमवारी, अजितदादांच्या भेटीचा दिवस कोणता?

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.