उद्धव ठाकरेंसाठी पुरण पोळी, एनडीएच्या डिनर पार्टीतील मेन्यू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे निकालापूर्वीचे अंदाज म्हणजेच एग्झिट पोलचे अंदाज नुकतेच जाहीर झाले. त्यामध्ये जवळपास सर्वच एग्झिट पोलने एनडीए पुन्हा सत्तेत येणार, असे अंदाज वर्तवले. एग्झिट पोलमध्ये एनडीएला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  त्यामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. एग्झिट पोलनंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या घटकपक्षांना मंगळवारी …

उद्धव ठाकरेंसाठी पुरण पोळी, एनडीएच्या डिनर पार्टीतील मेन्यू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे निकालापूर्वीचे अंदाज म्हणजेच एग्झिट पोलचे अंदाज नुकतेच जाहीर झाले. त्यामध्ये जवळपास सर्वच एग्झिट पोलने एनडीए पुन्हा सत्तेत येणार, असे अंदाज वर्तवले. एग्झिट पोलमध्ये एनडीएला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  त्यामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे.

एग्झिट पोलनंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एनडीएच्या घटकपक्षांना मंगळवारी डिनर म्हणजेच स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं. शाह यांच्या या शाही डिनरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासह एनडीएचे अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या शाही पार्टीमध्ये नेतेमंडळींसाठी खास पंचपक्वान्न तयार करण्यात आले आहेत. या शाही पार्टीच्या मेन्यूमध्ये प्रत्येक नेत्यासाठी त्यांच्या-त्यांच्या आवडीचे पदार्थ ठेवण्यात आले आहेत.

या शाही पार्टीला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी खासकरुन महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण तयार करण्यात आलं आहे. यामध्ये पुरण पोळीही असणार आहे. उद्धव ठाकरे हे युरोपात असल्याने ते या बैठकीत सामील होणार नव्हते. मात्र, अमित शहांच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरे या बैठकीत सामील झाले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठीही अमित शाह यांनी खास जेवणाची व्यवस्था केली आहे. नितीश कुमार यांच्यासाठी खास लिट्टी चोखा आणि सत्तू तयार करण्यात आलं आहे.

इशान्य भारतातील नेतेही या शाही पार्टीमध्ये सहभाही होणार आहेत. त्यांच्यासाठीही अमित शाहांनी खास त्यांच्या आवडीच्या पदार्थांची मेजवाणी ठेवली आहे. त्यासोबतच या पार्टीला पंजाबची नेतेमंडळीही हजर राहाणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष पंजाबी जेवण तयार करण्यात आले आहे.

“या डिनर पार्टीमध्ये वेगवेगळ्या राज्यातून नेतेमंडळी हजर राहाणार आहेत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, या पार्टीच्या माध्यमातून एनडीए हा संदेश देऊ इच्छिते की, आम्ही वेगवेगळ्या राज्यात काम करत असलो, तरी आम्ही सर्व एक कुटुंब आहोत”, असं बाजप कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *