AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या; अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. महागाई भत्ता, घरभाडे वाढीचा प्रश्न मार्गी लावलाय. वेतनवाढीचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवणार असल्याचं परब यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी कामावर यावं, दिवाळी आहे, असं आवाहन परब यांनी केलंय.

वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या; अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
अनिल परब, परिवहन मंत्री
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 4:08 PM
Share

मुंबई : राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसह अन्य प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. महागाई भत्ता, घरभाडे वाढीचा प्रश्न मार्गी लावलाय. वेतनवाढीचा प्रश्नही दिवाळीनंतर सोडवणार असल्याचं परब यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी कामावर यावं, दिवाळी आहे, असं आवाहन परब यांनी केलंय. (Transport Minister Anil Parab appeals to ST employees to retrun on work)

राजकीय पक्षाने या आंदोलनास आता साथ दिली आहे. परंतू 87 टक्के कामकाज सुरु झालंय. 28 डेपो बंद आहेत. भावना भडकावण्याच्या आमिषाला बळी पडू नका. आत्महत्या करु नका. कर्मचारी कामावर येऊ पाहत आहेत, पण काहीजण त्यांना अडवत आहेत. दिवाळी असल्यानं कुणावरही कारवाई करणार नाही. मात्र, अजून कारवाई केली नसली तरी पुढे विचार करावा लागेल. बेशिस्त खपवून घेणार नाही, असा इशाराही परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

‘देगलूरचा विजय म्हणजे सरकारच्या कामाची पोचपावती’

दादरा नगर-हवेलीच्या निमित्तानं आम्ही राज्याबाहेर भगवा फडवला आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे. देगलूरचा विजय म्हणजे सरकार दमदारपणे काम करत असल्याची पोच पावती आहे, असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केलाय. तर अनिल देशमुख प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचं सांगत परब यांनी जास्ती बोलण्यास नकार दिला. तर मी यंत्रणांना जबाबदार आहे, बाकी कुणाला नाही. ते काहीही बोलू देत, असंही परब माध्यमांशी बोलताना म्हणाले.

‘बीएमसीवर भगवा ध्वज फडकणार’

सध्या राजकीय फटाक्यांची चर्चा जोरात आहे. त्यावर तुम्हीही फटाके फोडणार का असा प्रश्न परब यांना विचारण्यात आला. त्यावेळी सध्या फटाक्यांवर बंदी आहे, अशी मिश्किल टिप्पणी परब यांनी केलीय. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय. त्यावर बोलताना आयुक्तांनी पेन ड्राईव्ह बदलला हा फक्त आरोप आहे. पुरावे कुठे आहेत? रडीचा डाव खेळणारा मी नाही. मी निवडणुकीला सामोरा जाणारा आहे. बीएमसीवर भगवा ध्वज फडकेल अशी खात्रीही परब यांनी व्यक्त केलीय.

इतर बातम्या :

दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

वसूली गँगचा पर्दाफाश होतोय, वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार, मलिकांचा दावा

Transport Minister Anil Parab appeals to ST employees to retrun on work

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.