सुभाष देसाईंचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत, अन्य दावेदार अस्वस्थ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला उर्वरित चार महिन्यांसाठी का होईना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सुभाष देसाईंचं नाव आघाडीवर आहे की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील केंद्रीय नेत्यांना डावलून दिल्लीतील NDA च्या बैठकीला सुभाष देसाई […]

सुभाष देसाईंचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत, अन्य दावेदार अस्वस्थ?
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 8:34 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला उर्वरित चार महिन्यांसाठी का होईना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सुभाष देसाईंचं नाव आघाडीवर आहे की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील केंद्रीय नेत्यांना डावलून दिल्लीतील NDA च्या बैठकीला सुभाष देसाई यांना पाचारण केल्याने चर्चेला उधाण आहे. यामुळे शिवसेनेतील उपमुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. त्यामध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत पुढे सत्ता आल्यास अधिकार आणि जबाबदारीचे समसमान वाटप असा युतीचा नवा फॉर्म्युला ठरला आहे.  त्यामुळे सत्ता आल्यास सुभाष देसाई शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत का असा प्रश्न आजच्या परिस्थितीमुळे उपस्थित होत आहे.

स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेनंतरही भाजपशी युती होण्यामागे सुभाष देसाई यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती. सुभाष देसाई हे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला महत्वाचा दुवा आहेत. देसाई हे NDA च्या बैठकीला उपस्थित राहाणार असले तरी, अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन, उद्धव आणि आदित्य यांनी उपस्थित राहावे अशी आग्रही विनंती केली. त्यामुळे परदेशातून मोठा हवाई प्रवास करीत दुपारी 12 वाजता मुंबईत परतल्यानंतर उद्धव आणि आदित्य NDA च्या बैठकीला दिल्लीत उपस्थित आहेत.

दावेदार नाराज?

दरम्यान, सुभाष देसाई यांना थेट दिल्लीला पाचारण केल्याने शिवसेनेचे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते यासारख्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरणे साहजिक आहे.

2014 ला विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्यामुळे शिवसेनेला जास्त मंत्रीपदं मिळाली नाही. त्यामुळे भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी करत काही मोठे फेरबदल करण्याचं धोरण आखल्याची माहिती आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली होती. 2014 ला लोकसभा एकत्र लढल्यानंतर शिवसेना आणि भाजपने विधानसभेला वेगळं लढण्याची भूमिका घेतली. पण यावेळी एकत्र निवडणूक लढणार हे अगोदरच स्पष्ट करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी 1000 कोटींचा सट्टा, कुणाला किती भाव?

धनंजय मुंडेंचं एकच ध्येय, खोटं बोल पण रेटून बोल : पंकजा मुंडे

विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीला 50 जागाही मिळणार नाहीत : गिरीश महाजन

एनडीएच्या बैठकीला येण्यासाठी अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना 8 फोन

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.