AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला

कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता तयार झाल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे.

मायावतींचा कर्नाटकाच्या बसपा आमदाराला विश्वासमतापासून दूर राहण्याचा सल्ला
| Edited By: | Updated on: Jul 21, 2019 | 6:51 PM
Share

बंगळुरु : कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता तयार झाल्याने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेक्युलर) आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वातील सरकार संकटात आले आहे. उद्या (22 जुलै) सकाळी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विधानसभेत विश्वासमत सादर करणार आहेत. मात्र विश्वासमत प्रक्रियेदरम्यान कर्नाटकातील बहुजन समाज पक्षाच्या (Karnatak BSP MLA) आमदाराला उपस्थित न राहण्याचे आदेश पक्षाध्यक्ष मायावती यांनी दिले आहेत.

“मला पक्षाने विश्वासमत प्रक्रियेपासून लांब राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी सोमवारी आणि मंगळवारी विधानसभेत उपस्थित राहणार नाही. या दरम्यान मी माझ्या मतदारसंघात उपस्थित राहीन”, असं कर्नाटक बीएसपी आमदार (Karnatak BSP MLA) एन. महेश यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकानंतर जेडीएस आणि काँग्रेस सरकार संकटात सापडले आहे. आता सोमवारी (22 जुलै) जेडीएस आणि काँग्रेस सरकारचा अंत होईल, असं म्हटलं जात आहे. कर्नाटकाच्या राज्यपालांनी गुरुवारी जेडीएस आणि काँग्रेस सरकारला (18 जुलै) विश्वासमत सादर करण्यास सांगितले होते. यानंतर ही तारीख एक दिवस वाढवली. पण शुक्रवारीही (19 जुलै) विश्वासमत सादर न केल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सोमवार पर्यंत सत्र स्थगित केले.

कर्नाटक विधानसभेतील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेचं एकूण संख्याबळ 224 आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांची गैरहजेरी असल्यास संख्याबळ 209 वर येईल. यानुसार बहुमताचा आकडा 105 पर्यंत येतो, जो भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळवून देईल. कारण, भाजपकडे सध्या स्वतःचे 105 आमदार आहेत, तर एका अपक्षाचंही समर्थन मिळालंय. केपीजेपीचाही आमदार भाजपला समर्थन देत असल्यामुळे एकूण संख्याबळ 107 होतं, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी बहुमत सिद्ध न करु शकल्यास भाजपचं सरकार येणं निश्चित आहे.

15 आमदार गैरहजर राहिल्यानंतरचं समीकरण

एकूण आमदार – 224 गैरहजर आमदार – 15 गैरहजेरीनंतरची एकूण संख्या – 209 बहुमत – 105 भाजप – 105 अपक्ष – 1 (भाजपला पाठिंबा) केपीजेपी – 1 (भाजपला पाठिंबा) भाजप+ 107

काँग्रेस-जेडीएस

कांग्रेस – 66 (विधानसभा अध्यक्षांसहित) जेडीएस – 34 बसपा – 1 एकूण – 101

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.