AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते. मात्र आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती
Aanandrao MalgundeImage Credit source: Google
| Updated on: Jul 30, 2026 | 10:08 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी ईश्वरपूरच्या नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते. मात्र आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असणारे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते, मात्र आता या पदाला स्थिगिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

ईश्वरपूरचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते. सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी बांधकाम अनियमित प्रकरणी आनंदराव मलगुंडे यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली होती. नगराध्यक्ष पदाबरोबर मलगुंडे यांचे बंधू सुनील मलगुंडे यांचे नगरसेवक पद देखील अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र आता नगर विकास विभागाकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पद अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद कायम राहणार आहे. या प्रकरणी शरद पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

नगराध्यक्षपद रद्द का झाले होते?

आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीची पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे. या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतची सर्व माहिती जाधव यांनी माहिती अधिकारात मागवली होती. नंतर ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देत आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला होता. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे असा आरोप जाधव यांनी केला होता. सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदराव मलगुंडे यांचे पद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

Follow Us
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
Delhi Police | CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली भूमिका, म्हणाले आता...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
Satara Koyna Dam | कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ; नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू रागाने लाल!
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
Anil Parab | अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच
स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी... थेट संसदेतच बड्या नेत्याने केला खळबळजनक दावा
मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
Rajyasabha | मनुस्मृतीवरून संसदेत घमासान! खर्गेंच्या वक्तव्याने राज्यसभा दणाणली
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक,
केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?
कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर
Pune | कचरा टेंडरवरून पुणे महापालिकेत हायव्होल्टेज ड्रामा; शिवसैनिक थेट गेटवर चढले!
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद