AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस शिमगा : सुधीर मुनगंटीवार

आता नवीन पद्धतीत शिमगा आणि शिमग्याचा रंग म्हणजे पत्र," असे मुनगंटीवार म्हणाले.  (Sudhir Mungantiwar Comment on Sharad Pawar letter to Governor)

राज्य सरकारला प्रश्न सोडवण्यात अपयश, म्हणून 365 दिवस शिमगा : सुधीर मुनगंटीवार
| Updated on: Oct 28, 2020 | 3:11 PM
Share

मुंबई : “राज्य सरकारला काही प्रश्न सोडवण्यात 100 टक्के अपयश आलं आहे. त्यामुळे त्यांनी 365 दिवस शिमगा ही नवीन पद्धत सुरु केली आहे,” अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ या कॉफी टेबल पुस्तकावरुन एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रतिक्रिया देत टीका केली. (Sudhir Mungantiwar Comment on Sharad Pawar letter to Governor Bhagat Singh Koshyari)

“मी शरद पवारांचे अभिनंदन करतो. त्यांचे पोस्टमनवर प्रेम आहे. प्रत्येक गोष्ट ते पत्राच्या माध्यमातून पत्राचा उपयोग करत ते पोस्ट विभागातून आपलं प्रेम व्यक्त करतात. खरतर एक नवीन पद्धत विकसित झाली आहे. पहिल्यांदा 365 दिवसांपैकी एक दिवस शिमगा राहायचा. आता नवीन पद्धतीत शिमगा आणि शिमग्याचा रंग म्हणजे पत्र,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

“राज्यपालांवर टीका करायची, राष्ट्रपतींवर टीका करायची, निवडणूक आयोगावर टीका करायची, ईव्हीएम मशीनवर टीका करायची. मग कधी सीबीआयवर टीका करायची. त्यात आता एक नवीन शिमगा पद्धत काही राजकीय पक्षांनी सुरु केली आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

“काही प्रश्न सोडवण्यात 100 टक्के अपयश आल्याने 365 दिवस शिमगा असा पद्धतीने नवीन कारभार सुरु झाला आहे.  अनुदान, शेतकऱ्यांच्या समस्या, अतिवृष्टीग्रस्तांना मदत यावर कोणीही बोलत नाही,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल सचिवालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेलं ‘जनराज्यपाल – भगतसिंह कोश्यारी’ हे चित्ररुप कॉफी टेबल पुस्तक शरद पवार यांना पाठवले होते. त्या पुस्तकावरुन शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांना खरमरीत शब्दात एक पत्र लिहिलं.

सुरुवातीला या पुस्तकाच्या शिर्षकावरुनच पवार यांनी राज्यपालांना फटकारले आहे. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”. अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं आहे. (Sudhir Mungantiwar Comment on Sharad Pawar letter to Governor Bhagat Singh Koshyari)

संबंधित बातम्या : 

स्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे? शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.