शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का? : सुधीर मुनगंटीवार

"शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आहे?", असा खोचक सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. (Sudhir Mungantiwar on CM Uddhav Thackeray Speech)

शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का? : सुधीर मुनगंटीवार


मुंबई : “शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आहे?”, असा खोचक सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं (Sudhir Mungantiwar on CM Uddhav Thackeray Speech).

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “आज तुमच्या हातात अधिकार आहे. मग अधिकारांचा उपयोग करा. शेतकरी बांधव संकटात आहे. दिलेले शब्द पूर्ण करा. विरोधकांवर टीका करुन अर्थचक्र पुढे जाणार नाही. त्यासाठी विजयादशमीच्या दिवशी प्रेम वाटायचं असतं. पण तुम्ही असत्य कथन करतात”, असा घणाघात त्यांनी केला.

“देशातील 90 टक्के राज्यांमध्ये मंदिरं, मशिदी, गुरुद्वार, चर्च उघडण्यात आले. इतर राज्यांचे मुख्यमंत्री हे बिनामताचे मुख्यमंत्री झाले का? ज्यांची मैत्री आहे त्यांनी कुणीही मित्र पक्षाशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदाची खुर्ची प्राप्त केली नाही. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना धार्मिक स्थळ खुली करायची की नाही हे समजत नाही. पण यांना मात्र भरपूर समजतं”, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला (Sudhir Mungantiwar on CM Uddhav Thackeray Speech).

अभिनेत्री कंगना रनौतच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. यावरदेखील मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “जो व्यक्ती देशाच्या, महाराष्ट्राच्या गौरवावर, महापुरुषांवर, देशाच्या मानस्तंभावर, भारत मातेबद्दल अभद्र बोलत असेल त्याचा आपण सर्वचजण निषेध करतो. या भारताला पाकिस्तानकडून काही शिकावं, असं म्हणाणाऱ्यांसोबत सरकारमध्ये लोकं बसतात. अतिरेक्यांना फाशी देऊ नका, असं म्हणणाऱ्यांसोबत सरकारमध्ये बसलं जातं”, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला.

“एक कुणी नटीने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं असल्याचं वक्तव्य केलं, त्याच शब्दाचं राजकारण करायचं. पाकव्याप्त काश्मीर हे महाराष्ट्राच्या कोणत्याही राजकीय पक्षाने म्हटलेलं नाही. पण आपल्यासाठी सोयीस्कर राजकारण हाती घेणं. सोयीस्कर राजकारण करायचं आणि भावना पेटवायच्या. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना मदत करा”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI