VIDEO: ‘तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवलं. या संपूर्ण अधिवेशनात फडणवीस यांना विधानसभेत तडाखेबंद साथ मिळाली ती ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची. (Sudhir Mungantiwar slams MVA government over various issues in assembly session)

VIDEO: 'तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा'
सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवलं. या संपूर्ण अधिवेशनात फडणवीस यांना विधानसभेत तडाखेबंद साथ मिळाली ती ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची. मुनगंटीवार यांनी आघाडी सरकारच्या लव्ह जिहादपासून ते राष्ट्रपती राजवटीपर्यंतचा घणाघात करून राज्य सरकारला सळो की पळो करून सोडलं. फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर अधिवेशनाचा आखाडा मुनगंटीवार यांनी गाजवला. (Sudhir Mungantiwar slams MVA government over various issues in assembly session)

वैधानिक विकास महामंडळावरून आक्रमक

वैधानिक विकास महामंडळावरुन मुनगंटीवार यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आक्रमक पवित्रा घेतला. मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं ते म्हणाले. सरकारने वर्षभर विदर्भ आणि मराठवाड्याच्या वैधानिक विकास महामंडळला मुदत वाढ दिली नाही. जनतेसोबत विश्वासघात केला आहे. वैधानिक विकास महामंडळाच कवच ने देता सरकार निधीची तरतूद करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला पैसे खर्च न होता नसतीच्या माध्यमातून इतर भागात खर्च होतील. त्यामुळे नवीन अनुशेष आणि पुन्हा समिती नेमावा लागेल, असं सांगत सरकारने आजच्या आजच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी करत मुनगंटीवार यांनी पहिल्याच दिवशी सरकारचा निषेध म्हणून सभात्याग केला होता.

तर राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल

अधिवेशनाच्या तिसऱ्याच सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले होते. त्यावर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यांचं हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणीही केली. त्यानंतर या वाक्याचे दिवसभर पडसाद उमटत राहिले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मुद्दयावरून भाजपवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. पण मुनगंटीवार यांनी वर्मी घाव घालून आघाडीच्या तंबूत खळबळ उडवू दिली होती.

गृहमंत्री असूनही तुम्ही खूनच केला असता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात विरोधक आक्रमक होताना दिसले. मुनंगटीवार यांनी आक्रमक भाषेतअनिल देशमुख यांना लक्ष्य केले. जळगावातील वसतीगृहात पोलिसांकडून मुलींना नग्न करुन नाचायला लावण्यात आले. या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर हा केवळ विचार करुन पाहा. तुम्ही गृहमंत्री असलात तरी असा प्रकार झाला असता तर तुम्ही खूनच केला असता, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. इतक्या घृणास्पद घटनेनंतरही राज्य सरकार फक्त नोंद घेऊ म्हणते. विरोधी पक्षातील आमदार काय मेलेल्या मनाचे आहेत का? आमचं मन जिवंत आहे. तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. अशा प्रकारानंतर किती तासात संबंधितांवर कारवाई करणार, किती तासात करणार, हे सरकारने सांगायला पाहिजे. हे पाप तुम्हाला फेडावे लागेल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

आघाडी हा राजकीय लव्ह जिहाद

त्यानंतर मुनगंटीवार यांनी कोरोना परिस्थितीवर बोलताना ठाकरे सरकारला चिमटे काढले. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमची 72 तासांची मैत्री होती. तरीही ती कायम आहे, असं सांगतानाच आघाडी सरकार हा तर राज्यातील राजकीय लव्ह जिहाद होता, असा टोला मुनगंटीवार लगावला. या सरकारकडे विधानसभा चमकवण्यासाठी 15 कोटी रुपये आहेत, पण गोरगरीबांसाठी पैसै नाहीत. हे सरकार करंट असून अधिकारी आहे… पण राज्य भकास आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अजितदादांविरोधात हक्कभंग

त्यानंतर 4 मार्च रोजी मुनगुंटीवार यांनी संसदीय आयुधाचा वापर करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अजित पवार यांनी वैधानिक विकास मंडळ लवकरात लवकर देण्यात येईल असं 15 डिसेंबर 2020 रोजी आश्वासन दिले होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करणे हा सभागृहाचा अवमान आहे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला होता. (Sudhir Mungantiwar slams MVA government over various issues in assembly session)

हमारा दौर फिरसे आयेगा… आज काय घडले?

आजही सुधीर मुनंगटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चांगलीच जुंपली. पण आज दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शेरोशायरीतून पलटवार केला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना क्यूँ मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना क्यूँ मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख यांनी ही गझल ऐकवताच हजरजबाबी मुनगंटीवार यांनीही शेर सादर करून देशमुखांना प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा.’ असं त्यांनी म्हणताच सभागृहात सदस्यांनी बेंच वाजवून त्याचं स्वागत केलं. (Sudhir Mungantiwar slams MVA government over various issues in assembly session)

संबंधित बातम्या:

मुनगंटीवार संतापाच्या भरात देशमुखांना म्हणाले; तुम्ही गृहमंत्री असूनही त्याचा खूनच केला असता

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

दादांच्या पोटातलं ओठावर आलं; वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली

(Sudhir Mungantiwar slams MVA government over various issues in assembly session)

Published On - 2:39 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI