AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम शिंदेंच्या प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील पितापुत्र भाजपला जड भरतायत?

अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप नेते सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या छुप्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. (Sujay Vikhe-Rohit Pawar Started Hidden alliance in nagar?, ram shinde on backfoot?)

राम शिंदेंच्या प्रकरणात राधाकृष्ण विखे-पाटील पितापुत्र भाजपला जड भरतायत?
| Updated on: Feb 09, 2021 | 1:16 PM
Share

नगर: अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप नेते सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या छुप्या युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. या निमित्ताने भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजप नेते राम शिंदे यांनाच कात्रजचा घाट दाखवल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. विखे-पवारांच्या या नव्या नगरी पॅटर्नमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून राम शिंदेंच्या प्रकरणात विखे-पाटील भाजपलाही जड जात असल्याचं या निमित्ताने बोललं जात आहे. (Sujay Vikhe-Rohit Pawar Started Hidden alliance in nagar?, ram shinde on backfoot?)

काय आहे प्रकरण?

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येत आहे. विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे सोपा झाला आहे. विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. याच चर्चांवर फेसबुक पोस्ट लिहित शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

शिंदेंचा पराभव

राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदेचा ४३ हजाराहून अधिकच्या मताधिक्याने केला होता. त्यामुळे राम शिंदे खूप अस्वस्थ झाले होते. राम शिंदे मंत्री असातनाही त्यांचा पराभव झाल्याने भाजपमध्येही अस्वस्थता पसरली होती.

पराभवाची कारणं

राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमधून उभे होते. त्यांचा थेट सामना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवारांशी होता. त्यामुळे धनगर विरुद्ध मराठा अशी ही थेट निवडणूक झाली होती. या निवडणुकीला जातीय वलयही निर्माण झालं होतं. तसेच मराठा उमेदवार निवडून यावा अशी भावना कर्जत-जामखेडमध्ये निर्माण करण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाले होते. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट ओसरली होती. त्याचवेळी साताऱ्यातील पावसातील सभेमुळे शरद पवारांची राज्यात लाट आली होती. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे-पवार यांच्यात तुल्यबळ लढत झाली अन् अखेर शिंदे यांना पराभव पत्कारावा लागला होता.

राम शिंदेंचा विखे-पाटलांवर थेट आरोप

कर्जत-जामखेडमधील पराभवामुळे राम शिंदे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी या पराभवाचं थेट खापर भाजपमध्ये नुकतेच आलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर फोडले होते. तसेच विखे-पाटील पितापुत्रांची वरिष्ठांकडे तक्रारही केली होती. एवढेच नव्हे तर राम शिंदे यांनी मीडियासमोर येऊन हे आरोप केले होते. विखे पाटलांना पक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी नगरमध्ये 12-शून्य करू, असं म्हटलं होतं. मात्र तसं काहीही न होता. उलट आमच्या आहे, त्यापैकी दोन जागा कमी झाल्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला, असं मला वाटत नाही, अशी टीका राम शिंदे यांनी केली होती. कोपरगाव, राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डिले यांनीही विखेंचा फायदा झाला नसल्याचे सांगितले होते. विखे यांनी त्यांच्या मेहुण्याला कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष उभे केले. मात्र, त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. एकप्रकारे पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्यामुळे पराभव झाल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी माझाशी बोलताना सांगितले. तर, शिवाजी कर्डिले यांनीही भाजपला आयात लोकांचा तोटाच झाल्याचे सांगितले होते. त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली होती. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही स्थापन केली होती. त्यामुळे विखे पाटील पक्षाला जड जात असल्याचं बोललं जात होतं.

समितीचा अहवाल नाही, पण राम शिंदे सुजय यांना भेटले

राम शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन भाजपने चौकशी समिती नेमली. पण त्या समितीचा अहवाल आलाच नाही. तसेच कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. या दरम्यान, शिंदे यांची समजूत काढण्यात भाजपला यश आले. त्यामुळे शिंदेही राग विसरून पुन्हा कामाला लागले. एवढेच नव्हे तर नोव्हेंबर 2020मध्ये सुजय विखे-पाटलांच्या वाढदिवसानिमित्त राम शिंदे यांनी सुजय यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वैर संपल्याचं बोललं जात होतं.

बाप-बेट्यांनी झटका दिला

राम शिंदे यांनी पराभव विसरून विखे-पाटलांकडे मैत्रीचा हात पुढे केल्याचं बोललं जात असतानाच आता अहमदनगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विखे-पाटलांनी शिंदे यांना झटका दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकट्या राधाकृष्ण विखे-पाटलांनी शिंदेंना धोबीपछाड केलं होतं. पण नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता राधाकृष्ण विखे-पाटील आणि सुजय विखे-पाटील या बापबेट्यांनी मिळून शिंदेंना धोबीपछाड केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे सुजय यांनी शिंदे यांचे विरोधक रोहित पवार यांच्याशी हात मिळवणी करून शिंदे यांचा गेम केल्याने शिंदे यांच्यासमोर राजकीय संकट निर्माण झालं आहे.

पारंपारिक राजकीय वैरी पवार चालतात, शिंदे का नको?

पवार-विखे घराण्याचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राजकीय मंचावर दोन्ही कुटुंबातील नेते एकमेकांवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असं असतानाही पवारांशी हातमिळवणी करून विखे यांनी शिंदे यांना झटका दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विखेंना पारंपारिक वैरी पवार चालतात पण पक्षातील शिंदे का चालत नाहीत? असंही बोललं जात आहे. त्याचं कारणही वेगळं असल्याचं सांगण्यात येतं. पवार घराण्याचं वर्चस्व, बारामती, पुणे आणि कर्जत-जामखेड पर्यंत आहे. नगरमध्ये पवार घराण्याचं वर्चस्व नाही. येणाऱ्या काळात नगरमध्ये पवार घराण्याचं वर्चस्व वाढण्याची शक्यताही नाही. तसेच विखे-पाटलांनाही पुणे, बारामती, कर्जत-जामखेडमध्ये ताकद वाढवायची नाही. त्यांना नगरवरच वर्चस्व अबाधित ठेवायचं आहे. अशावेळी विखे-पाटलांना राम शिंदेंकडून अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. शिंदे हे नगरमध्ये आपलं राजकीय वर्चस्व वाढवू शकतात. तसं झाल्यास भविष्यात विखे पिता-पुत्रांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला जाऊ शकतो, म्हणूनच विखेंनी पवार परवडले पण शिंदे नको, अशी भूमिका घेतली असावी, असं राजकीय निरीक्षक सांगत आहेत. (Sujay Vikhe-Rohit Pawar Started Hidden alliance in nagar?, ram shinde on backfoot?)

सुजय- रोहित सूत ‘चला हवा येऊ द्या’ने जमलं?

सुजय विखे-पाटील आणि रोहित पवार ही विखे-पवार घराण्याची नवी पिढी आहे. दोघेही तरूण आणि शिकलेले आहेत. पण हे दोन्ही नेते राजकीय वैर विसरून एकत्र आले कसे? त्यांच्यात संवाद कसा झाला? यावर चर्चा सुरू आहे. काहींच्या मते, चला हवा द्या या टीव्हीवरील कार्यक्रमामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री जुळल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमात सुजय विखे पत्नीसह सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात रोहित पवार आणि पंकजा मुंडेही सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी सुजय विखे-रोहित पवार यांच्यात हास्यविनोदही रंगले होते. त्याचवेळी ऊसतोड कामगारांसाठी राजकीय मतभेद विसरून रोहित यांच्या सोबत काम करण्याची सुजय यांनी तयारीही दाखवली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्रीचा संवाद सुरू झाल्याचं बोललं जात आहे. (Sujay Vikhe-Rohit Pawar Started Hidden alliance in nagar?, ram shinde on backfoot?)

भाजपची डोकेदुखी वाढली

शिंदे यांच्या प्रकरणात भाजपला विखे जड जात असल्याचं बोललं जात आहे. नगरवरील विखेंची पकड पाहता त्यांच्यावर भाजपला कारवाई करता येत नाही. पण शिंदे यांच्या रुपाने धनगर नेत्याला दुखावणेही भाजपला परवडणारे नाही. त्यामुळे विखे-शिंदे यांच्यात दिलजमाई घडवून आणणे हाच भाजपसमोर पर्याय असून त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Sujay Vikhe-Rohit Pawar Started Hidden alliance in nagar?, ram shinde on backfoot?)

संबंधित बातम्या:

Special Story: ओबीसींची जनगणना भारतीय राजकारणाची कूस बदलणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

Special Story: प्रांतवादाकडून हिंदुत्वाकडे?, अयोध्येचा ‘राज’मार्ग यशस्वी होणार?; वाचा विशेष रिपोर्ट

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

(Sujay Vikhe-Rohit Pawar Started Hidden alliance in nagar?, ram shinde on backfoot?)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.