AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; हल्लाबोल करत म्हणाल्या, एक तर तो पुरुषच नाही…

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीतील खासदार सुप्रिया सुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच पक्ष फुटला हे बरं झाल्याचं मोठं विधानही त्यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बरं झालं पक्ष फुटला, सुप्रिया सुळे यांचं पहिल्यांदाच मोठं विधान; हल्लाबोल करत म्हणाल्या, एक तर तो पुरुषच नाही...
Supriya Sule Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 17, 2025 | 1:06 PM
Share

शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीवर थेट आणि मोठं विधान केलं आहे. बरं झालं पक्ष फुटला, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच त्यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाताली राष्ट्रवादीची आढावा बैठक होती. या बैठकीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे. मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. ते या पक्षात असते आणि मी या पक्षात असते तर एक तर ते तरी राहिले असते किंवा मी तरी राहिले असते. मी त्या पक्षात काम करू शकत नाही. . सगळया दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती. मी हे कधी बाहेर बोलले नाही, पण संघटनेत आहे म्हणून बोलते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

जो पुरुष स्वत:ची बायको..

जो पुरुष स्वत:ची जी बायको, जी आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर… एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी माईकवरही बोलेल. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. मी विरोधी पक्षात आयुष्य घालवेल, पण नैतिकता सोडणार नाही. मला नकोय ते कंत्राटदाराचे पैसे. माझं घर काही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशावर चालत नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.

शब्द दे सुप्रिया तू मला…

संतोष भाऊच्या आईला भेटा, बायकोला भेटा. महादेव मुंडेंच्या बायकोला भेटा. काय चूक केली त्यांनी? त्यांच्याकडे मुलांना लेकरं म्हणतात. आपण मुलं म्हणतो. महादेव मुंडेंची बायको विचारते, माझ्या लेकरांची चूक काय उत्तर द्या? काय उत्तर देणार? आणि मग जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले. त्यांच्या आईने माझा हात धरला. म्हणाल्या, तू मला न्याय देणार का? शब्द दे सुप्रिया तू मला न्याय देशील, असंही त्या म्हणाल्या.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...