रोहित-आदित्य यांची गळाभेट, अजित पवारांना पदस्पर्श, सुप्रिया सुळे आमदारांच्या स्वागताला

आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं, तर अजित पवारांच्या पाया पडत त्यांनी मिठी मारली.

रोहित-आदित्य यांची गळाभेट, अजित पवारांना पदस्पर्श, सुप्रिया सुळे आमदारांच्या स्वागताला
Follow us
| Updated on: Nov 27, 2019 | 9:15 AM

मुंबई : विधानभवनात नवनियुक्त 288 आमदार विधानसभेच्या सदस्यपदाची शपथ घेत आहेत. आमदारांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे स्वतः विधीमंडळाच्या गेटवर उभ्या होत्या. विधीमंडळात पाऊल ठेवणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची गळाभेट घेत सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं. तर अजित पवार यांच्या पाया पडत त्यांनी मिठी (Supriya Sule Greets Ajit Pawar) मारली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज (बुधवार 27 नोव्हेंबर) बोलावण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ (Maharashtra MLA Oath Ceremony) देत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून शपथविधी सुरु झाला.

गेला महिनाभर आमदारांच्या मनात धाकधूक आणि ताण होता. तो घालवण्यासाठी आपण स्वतः विधीमंडळात आल्याचं सुप्रिया सुळेंनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.

विधानभवनात नवनिर्वाचित 288 आमदारांचा शपथविधी सोहळा

अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे गेले काही दिवस पवार कुटुंबात तणाव होता. मात्र अजित पवार यांनी राजीनामा देत घरवापसी केली. अजित पवार काल शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकमध्ये गेले होते. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

शपथविधीला जाण्यासाठी अजित पवार धनंजय मुंडे यांच्यासोबत घरुन निघाले. ‘मी राष्ट्रवादी पक्षातच होतो. मला पक्षातून कधी काढलं? तुम्हीच सांगा’ असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना केला होता.

अजित पवारांच्या पुनरागमनासोबतच पवार कुटुंबातील ताणही विरल्याचं चित्र आहे. ‘दादाचंच घर आहे, त्याला वेलकम करण्याचा प्रश्नच येत नाही’ अशी प्रतिक्रियाही सुळेंनी दिली होती. सुप्रिया सुळे यांनीही दादाला परत येण्यासाठी भावनिक साद घातली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी शेअर (Supriya Sule Greets Ajit Pawar) केला होता.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नावाला ‘महाविकासआघाडी’ने एकमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार असणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.