AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम शिंदे पडणार, रोहित पवार जिंकणार, असं भाजपच म्हणतंय : सुप्रिया सुळे

भाजपच म्हणत आहे, की माझा मुलगा नापास होणार, असं सुप्रिया सुळे कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या प्रचारावेळी म्हणाल्या.

राम शिंदे पडणार, रोहित पवार जिंकणार, असं भाजपच म्हणतंय : सुप्रिया सुळे
| Updated on: Oct 18, 2019 | 10:35 AM
Share

अहमदनगर : भाजपचे मंत्री राम शिंदे पडणार आणि रोहित पवार निवडून येणार, असं मी नाही, भाजपच म्हणत आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule on Ram Shinde) म्हणाल्या. भाजपच्या अंतर्गत निवडणूक सर्व्हेचा दाखला देत सुप्रिया सुळेंनी रोहित पवार यांना निवांत राहण्याचा सल्ला दिला.

सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या निवडणूक सर्व्हेचा दाखला देत विधानसभा निवडणुकीत भाजपचे सहा मंत्री अडचणीत असल्याचं सांगितलं. ‘मी परवा बातम्या बघत होते. यावेळी भाजपचा एक सर्व्हे आल्याचं सांगितलं गेलं. सहा मंत्रीच पराभवाच्या छायेत असल्यामुळे भाजप चिंतेत असल्याचं यात दाखवलं. हा भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हे आहे, असं बातम्यांमध्ये म्हटलं. मी नाही म्हणत’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘सहा मंत्र्यांपैकी एक राम शिंदे आहेत. प्रत्येक आईला माहित असतं आपला मुलगा पास होणार की नापास. राम शिंदे यांची आई म्हणजे भाजप. जर भाजपच म्हणत असेल, की माझा मुलगा नापास होणार, तर काय बोलायचं?’ असं सुप्रिया सुळे (Supriya Sule on Ram Shinde) म्हणतात हास्याची लकेर उमटली.

‘रोहित पवार, तुम्ही आरामात बसा. दोन-चार दिवस काही प्रचार-बिचार नाही केला तरी चालेल. तुम्ही निवडून येतातच आहात. असं मी नाही, भाजप म्हणत आहे.’ असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंची दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा ‘सरप्राईज’ उमेदवार?

अहमदनगरला कर्जत जामखेड मतदारसंघातील रोहित पवार यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. या सभेसाठी सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर यांनी उपस्थिती लावली. कर्जत शहरातील बाजार तळावर झालेल्या या सभेला मोठ्या संख्येनं महिलांनी हजेरी लावली होती.

कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात शरद पवार यांचे नातू रोहित राजेंद्र पवार यांनी शड्डू ठोकला आहे.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.