शेवटच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव!

सचिन पाटील

|

Updated on: May 23, 2019 | 7:29 PM

सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा विजय निश्चित झाला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर हे 1 लाख 41 हजार मतांनी आघाडीवर होते.  त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या विजयाची औपचारीक घोषणा बाकी आहे. अखेरच्या निवडणुकीत शिंदेंचा पराभव दरम्यान, ही माझी शेवटची निवडणूक आहे […]

शेवटच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव!

सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा विजय निश्चित झाला आहे. डॉ. जयसिद्धेश्वर हे 1 लाख 41 हजार मतांनी आघाडीवर होते.  त्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या विजयाची औपचारीक घोषणा बाकी आहे.

अखेरच्या निवडणुकीत शिंदेंचा पराभव

दरम्यान, ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच केली होती. त्यामुळे शेवटच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेना पुन्हा पराभवला सामोरं जावं लागलं. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवार शरद बनसोड यांनी पराभव केला होता.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. इथं भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली.

सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार, प्रकाश आंबेडकर यासारख्या दिग्गजांच्या सभा झाल्या.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरप्रकाश आंबेडकर (VBA)पराभूत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI