गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात देशातील सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रोहित पवार यांच्या नेतृत्वात ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लेखामेंढा गावातून ग्रामपूजन करत यात्रेचा रथ रवाना करण्यात आला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नगर जिल्ह्यातील खर्डा इथल्या किल्ल्यावर हा देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकावला जाणार आहे. ‘आमच्या गावात आमचे सरकार’ चळवळीचे प्रणेते देवाजी तोफा यांच्या हस्ते ध्वज रवाना करण्यात आला. (MLA Rohit Pawar’s ‘Swarajya Dhwaj’ procession leaves Gadchiroli district)