AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tardeo Estate Agent: ताडदेव मांसाहार प्रकरणात मनसेची एण्ट्री! …तर थेट खळखट्याक, टार्गेटवर नेमकं कोण?

Tardeo Estate Agent: एक रिअल इस्टेट एजंटने तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवरुन आता संताप व्यक्त केला जात आहे.

Tardeo Estate Agent: ताडदेव मांसाहार प्रकरणात मनसेची एण्ट्री! ...तर थेट खळखट्याक, टार्गेटवर नेमकं कोण?
Bhavesh kavareImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 2:29 PM
Share

मुंबईतील ताडदेव परिसरातील एका इमारतीच्या घराच्या जाहिरातीने नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीत केवळ शाकाहारी लोकांनाच घर देण्यात येईल असे म्हटले आहे. रिअल इस्टेट एजंट भावेश कावरेने सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडीओ शेअर केला होता. आता हे प्रकरण मनेसेने हातात घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसात तक्रार दाखल

मनसे विभागाध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी ही तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीच्या माध्यमातून शाकाहारी-मांसाहारी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे सामाजिक, धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

तक्रारीत संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम १५३ए आणि २९५ए अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित व्यक्तीला अटक करावी, असेही सांगण्यात आले.

मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, या जाहिरातीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार राहील. ताडदेव परिसरातील या जाहिरातीने आता राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली असून, पोलिसांकडून पुढील कारवाईबाबत प्रतिक्रिया अपेक्षित आहे. ही घटना मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात शाकाहारी-मांसाहारी भेदाबाबत चालणाऱ्या चर्चांना नवे वळण देणारी ठरली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक रिअल इस्टेट एजंटने तुम्ही मांसाहार करत असाल तर ताडदेवमध्ये तुम्हाला घर मिळणार नाही. तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल असे म्हटले होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर भावेशने हा व्हिडीओ डिलिट करुन टाकला. आता मनसेने याविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

भावेशने या प्रकरणी दिली प्रतिक्रिया

भावेश कावरेने टीव्ही ९ मराठीशी खास संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, “जो फ्लॅटचा मालक आहे तोच ठरवेल की तो फ्लॅट कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही. मी ठरवणारा कोणीच नाही. त्यातच एक महान नेता आपल्या युवाला असं बोलतोय की, दिसेल तिथे ठोका. हे कितपत योग्य आहे? मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मावळा आहे. त्यांच्या राज्यातही शाकाहारी आणि मांसाहारी लोकंही होते.”

Follow Us
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड