AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभा निवडणुकीत ठाकरे, शरद पवार गटाच्या आमदारांचे मतदान कुणाला? कुणाचा व्हीप चालणार?

नवी दिल्ली | 13 फेब्रुवारी 2024 : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी महायुतीचे घटकपक्ष भाजपने तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) एक असे पाच उमेदवार दिले आहेत. तर, महाविकास आघाडीतील कॉंग्रेसने एक उमेदवार दिला आहे. अशा परीस्थितीत भाजपने आणखी एक उमदेवार दिल्यास या निवडणुकीत लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपने अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ […]

राज्यसभा निवडणुकीत ठाकरे, शरद पवार गटाच्या आमदारांचे मतदान कुणाला? कुणाचा व्हीप चालणार?
महाराष्ट्र लोकसभा निवडणूकImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Feb 14, 2024 | 11:17 PM
Share

नवी दिल्ली | 13 फेब्रुवारी 2024 : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी महायुतीचे घटकपक्ष भाजपने तीन, शिवसेना (शिंदे गट) एक आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) एक असे पाच उमेदवार दिले आहेत. तर, महाविकास आघाडीतील कॉंग्रेसने एक उमेदवार दिला आहे. अशा परीस्थितीत भाजपने आणखी एक उमदेवार दिल्यास या निवडणुकीत लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपने अशोक चव्हाण, मेधा गाडगीळ आणि डॉ.अजित गोपचडे, शिवसेनेचे (शिंदे गट) मिलिंद देवरा, अजितदादा गटाचे प्रफुल्ल पटेल आणि कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची संधी दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने चार जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. पण, पक्षाने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामुळे मोदी सरकारमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून कार्यरत असलेले 71 वर्षीय राणे यांना आगामी लोकसभा निवडणूक रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेसने माजी मंत्री आणि दलित नेते चंद्रकांत हंडोरे यांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी जून 2022 च्या द्वैवार्षिक निवडणुकीत त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. तर यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलला आहे. त्यांच्यासोबत केवळ अमर राजूरकर हे आमदार भाजपमध्ये गेल आहेत. तर अन्य 11 आमदार त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कॉंग्रेसचे बाबा सिद्दिकी यांनी अजितदादा गटात परवश केला. त्याचे पुत्र ईशान सिद्दिकी हे कॉंग्रेसचे मदार असले तरी त्याचे मतदान हे सत्ताधारी पक्षालाच होईल. त्यामुळे भाजपने आणखी एक उमेदवार जरी या निवडणुकीत उतरविला तरी हंडोरे यांना ते जड जाणार आहे.

भाजपचा आणखी एक उमेदवार देणार का यावर भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, सत्ताधारी आघाडी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यासाठी चौथा उमेदवार उभा करण्याच्या साधक-बाधक गोष्टींचा विचार करत आहे. परंतु, काँग्रेसने दलित नेत्याला उमेदवारी दिली आहे. अशावेळी चौथा उमेदवार उभा करून हंडोरे यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करायचा की नाही यावर आम्ही विचार करत आहोत. हे राजकीयदृष्ट्या योग्य ठरणार नाही. मात्र, बुधवार रात्री उशिरा यावर निर्णय अपेक्षित आहे असे सांगितले.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. सध्याच्या 284 आमदारांच्या संख्येसह राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 41 मतांचा कोटा आवश्यक आहे. या मतांचा कोटा लक्ष घेता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

कॉंग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र, अशोक चव्हाण, अमर राजूरकर आणि ईशान सिद्दिकी यांची मते सोडल्यास 41 इतकी मते आहेत. शिवाय ठाकरे गटाची 15 आणि शरद पवार गटाची १५ अशी एकूण 30 जादा मतांची कुमकही हंडोरे यांच्याकडे आहे. जर भाजपने आणखी चौथा उमेदवार दिला तर ही मते अबाधित ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आपल्या आमदारांना व्हीप बजावावा लागेल.

अशोक चव्हाण हे कॉंग्रेसची काही मते फोडतील असा अंदाज आहे. ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांनी दुसरा गट म्हणून मान्यता दिली आहे. तर, निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा गटाकडे दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना कुणाचा व्हीप लागू होणार हा प्रश्न आहे.

Follow Us
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, video
Abhijit Dipake | आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेच्या त्या फोन कॉलची तुफान चर्चा, व्हिडीओ पहाच
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! सोशल मीडियावर नवा वाद
CJP ची इन्साईड पार्टी, Video होतोय व्हायरल! तजिंदर बग्गांचा गंभीर आरोप; सोशल मीडियावर नवा वाद
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेप
एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार...
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! पेपर फुटलाच नव्हता; ती तक्रार खोटी?
24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
E 20 Janata Party | E-20 विरोधात जनआक्रोश! 24 तासांत E-20 जनता पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले
37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप...
Viral Video | 37 सेकंदांचा व्हिडिओ अन् सोशल मीडियावर संतापाची लाट; सोयाबीन चाप बनवण्याची घाणेरडी पद्धत उघड